मुंबई : गेल्या आठवड्यापासून महाराष्ट्रात पावसाने पुनरागमन केलं आहे. गेल्या आठवड्याभरात पडलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक भागात दरड कोसळण्याच्या घटना देखील घडल्या. तर काही भागात पावसाचं पाणी मोठ्या प्रमाणात साचल्यानं जनजीवन विस्कळीत झालं होतं. त्यानंतर जनजीवन पुर्वपदावर येत असतानाच आता हवामान विभागाने पुन्हा पावसाचा इशारा दिला आहे.
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजामुळे आता महाराष्ट्राच्या चिंतेत वाढ होण्याची शक्यता आहे. हवामान खात्यानं 6 जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि ठाणे या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे.
येत्या 29 आणि 30 तारखेला काही भागात अतिवृष्टीसदृष्य पावसाची शक्यता आहे. 29 आणि 30 तारखेसाठी हवामान खात्यानं 5 जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्यात रत्नागिरी, रायगड, पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. त्याचबरोबर ठाणे, पालघर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी 29 आणि 30 तारखेला यलो अलर्ट दिला आहे.
30 तारखेपर्यंत हवामान खात्यानं अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे आता कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता असल्यानं प्रशासन देखील तयारीला लागलं आहे. मध्यप्रदेश आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानं आता कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण कमी झालं आहे.