‘त्या’ खासदारांना मराठा आरक्षणाचा काय अभ्यास आहे?

नाव न घेता खासदार उदयन भोसले यांच्यावर छगन भुजबळ यांनी केली टीका 

0

मुंबई ः ”मराठा आरक्षण देण्याचा अधिकारी हा मुख्यमंत्र्यांचा नसतो. ते घटनेनुसार मिळते. मात्र, शरद पवारांवर आरोप करणाऱ्या खासदारांंचा अभ्यास नाही, त्यामुळे ते शरद पवार यांच्यावर टीका करत आहेत”, असा टोला राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी खासदार उदयन भोसले यांचे नाव न घेता लगावला आहे.

एबीपी माझा वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. छगन भुजबळ पुढे म्हणाले की, “मराठा आरक्षण शरद पवारांमुळे मिळालं नाही, असं म्हणणाऱ्या खासदारांचा अभ्यास काय? मराठा आरक्षणावरून भाजपाचं पडद्यामागचं राजकारण सुरू आहे”, असा आरोप त्यांनी भाजपावर केला.

”मराठा आरक्षणावरची अंतरिम स्थगिती उठविण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. २५ जानेवारीपासून या प्रश्नबाबत सुनावणी सुरू होईल. ज्या खासदारांनी शरद पवारांवर मराठा आरक्षण प्रकरणी टीका केली त्यातून भाजपाचा हेतू काय ते उघड होते”, असंही भुजबळ यांनी म्हंटलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.