काय होतास तू, काय झालास तू, कसा वाया गेलास तू ?

झुकेगा नही घुसेगा साला : देवेंद्र फडणवीस

0

मुंबई : ”उद्धव ठाकरे म्हणतात की, माझ्या वडीलांचे नाव पळवले. मी म्हणतो त्यांचे विचार कुठे गेले. वारसा जन्माने नव्हे कर्माने मिळतो. सावरकरांना रोज शिव्या दिल्या जातात पण उद्धव ठाकरे व त्यांचा मुलगा शिव्या देणाऱ्यांच्या गळ्यात गळे घालून फिरतात. मी उद्धव ठाकरेंना विचारतो की, काय होतास तू काय झालास तू असा कसा वाया गेलास तू..अशा शब्दात टीका करीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झुकेंगा नही साला घुसेंगा असे म्हणात ठाकरेंना आव्हान दिले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, ”उद्धव ठाकरे मला फडतूस गृहमंत्री म्हणाले, उद्धव ठाकरे फडतूस नही काडतूस हू मै झुकेंगा नही साला घुसेंगा” सावरकरांबद्दल जे अपशब्द काढतात त्यांच्याबद्दल माझ्या मनात यत्किंचितही सडक्या आणि कुचक्या मेंदूचे लोक सावरकरांचा अपमान करीत राहतील तोपर्यंत जनता अशा लोकांचा विरोध करीत राहतील.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अतोनात अत्याचार सहन केले. ते काय होते हे सोन्याचे चमचे घेवून जन्माला आलेल्या राहुल गांधींना काय माहीत? सावरकरांनी काय भोगले हे त्यांना माहीत नाही. आधी इंग्रजांनी नंतर त्यांच्याच एजंटांनी सावरकरांना त्रास दिला, आज त्यांचे विचार मानणाऱ्या राहुल गांधींना सावरकर समजू शकत नाही. आमचे ऐकू नका पण त्यांचीच आजी इंदिरा गांधींनी सावरकरांचा गौरव केला होता.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, सावरकरांच्या अभिनंदनाच्या ठरावाविरोधात काॅंग्रेस उभी राहीली त्यावेळी त्यांचेच आजोबा फिरोज गांधी ठरावाच्या बाजूने उभे राहीले. ज्यांचे नाव वापरता कमीत कमी त्यांचे तरी ऐका. जेवढा सावरकरांचा अपमान कराल तेवढे देशप्रेमी शिव्याशाप तुम्हाला देतील. सावरकरांनी राहुल गांधीसारखे संपवू शकत नाहीत. काॅंग्रेस अध्यक्ष सावरकरांवर लांच्छन लावतात व आमच्यासोबत राहीलेले मित्र (उद्धव ठाकरे) त्यांच्या मांडींला मांडी लावून बसतात.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी उद्धव ठाकरेंना विचारतो की, काय होतास तु काय झालास तु असा कसा वाया गेलास तू. मणीशंकरांनी सावरकरांविरोधात अपशब्द काढल्यानंतर मणीशंकर अय्यरांच्या तोंडावर बाळासाहेब ठाकरेंनी जोडा मारला होता. उद्धव ठाकरे म्हणतात की, माझ्या वडीलांचे नाव पळवले. मी म्हणतो त्यांचे विचार कुठे गेले. त्यांची कृती सोडली म्हणून एकनाथ शिंदे मैदानात उतरले. वारसा जन्माने नाही कर्माने मिळतो.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, वर्षानुवर्षे स्थानबद्धता व अत्याचार होत असतानाही त्यांनी इंग्रजापुढे हार मानली नाही. अस्पृश्यांना मंदिर खुले करून दिले. जातीभेद विसरून सोबत जेवण करण्यासाठी पुढाकार घेतला. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांना काळाराम मंदिरावेळीच्या आंदोलनाला पाठींबा दिला. हिंदुंची व्याख्या सावरकरांनी मांडली. अंधश्रद्धेविरोधात कार्य केले. ते विज्ञाननिष्ठ होते ते खऱ्या अर्थाने सुधारक होते.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, सावरकरांवर टीका काय करता.. सावरकरांनी खऱ्या अर्थाने क्रांतिची ज्योत पेटवली. सावरकरांनी लहानपणापासून बाराव्या वर्षी स्वातंत्र्यलक्ष्मीची आराधना करणारी कविता लिहील. तेव्हाच त्यांनी स्वातंत्र्य मिळवण्याची शपथ घेतली. देश कशाप्रकारे स्वतंत्र होईल याचाच त्यांच्या मनात विचार होता.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, 1857तो लढा चिरडला तेव्हा इंग्रजांना वाटायचे की, आता स्वातंत्र्य लढवणारी पिढी संपली पण एक पिढी पुन्हा भारतात तयार झाली. मदनलाल धिंग्रा असो की, लोकमान्य टिळक यांनी इंग्रजांविरोधात लढा दिला, त्यानंतर सावरकर हे देशातील क्रांतिकारकांना प्रेरणा देत होते. हे इंग्रजांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सावरकरांवर कारवाया सुरू केल्या. त्यांना अटक केली. डिग्रीही काढून घेतली.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, काॅंग्रेसवाले वारंवार म्हणतात की, सावरकरांनी माफी मागीतली पण सावरकरांनी जेव्हा अर्ज केला होता. त्यावेळी सावरकर फाॅर्मट पूर्ण वापरला पण शेवटी म्हणतात की, मला तुम्ही सोडणार नाही पण बाकीच्या कैद्यांना सोडा. महात्मा गांधींनीही सावरकरांना याचिका करा असे सांगितले. जाॅर्ज पंचम म्हणाला की, सर्व राजकीय कैद्यांना सोडू पण सावरकरांना सोडू शकले नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.