हिंदूंचा नेता पंतप्रधान असताना हिंदूंना जनआक्रोश मोर्चा काढावा लागतो : उध्द्वव ठाकरे

0

छत्रपती संभाजीनगर : तुम्ही स्वत:ला देशातला सर्वात मोठा नेता मानता, हिंदूंचे नेते देशांचे पंतप्रधान झाले आहेत, असे असूनही हिंदंूना जनआक्रोश मोर्चा काढावा लागतो. मग हा नेता काय कामाचा? अशी घणाघाती टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.रविवारी मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेत ठाकरे यांनी थेट पंतप्रधान मोदी यांना लक्ष्य केले. या सभेला विरोधी पक्षनेते अजित पवार, ज्येष्ठ काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मंत्री धनंजय मुंडे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री राजेश टोपे,विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, आदित्य ठाकरे यांच्यासह आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित होते.

तुम्ही स्वत:ला देशातला सर्वात मोठा नेता मानता, हिंदूंचे नेते देशांचे पंतप्रधान झाले आहेत, असे असूनही हिंदंूना जनआक्रोश मोर्चा काढावा लागतो. मग हा नेता काय कामाचा? अशी घणाघाती टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.रविवारी मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेत ठाकरे यांनी थेट पंतप्रधान मोदी यांना लक्ष्य केले. या सभेला विरोधी पक्षनेते अजित पवार, ज्येष्ठ काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मंत्री धनंजय मुंडे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री राजेश टोपे,विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, आदित्य ठाकरे यांच्यासह आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित होते.

तीनही पक्षांची मिळून पहिली सभा रविवारी छत्रपती संभाजीनगरात झाली. यावेळी पुढे बोलतांना उद्धव ठाकरे म्हणाले महाविकास आघाडीचे सरकार असताना कोणालाही आक्रोश करावा लागला नाही. नुकताच हिंदु आक्रोश मोर्चा मुंबईत निघाला, तो शिवसेना भवनासमोर देखील आला होता. मी हिंदुत्व सोडलं असा आरोप माझ्यावर केला जातो. मात्र असे एक तरी उदाहारण मला दाखवून द्या. आम्ही काँग्रेस सोबत गेलो म्हणून हिंदुत्व सोडलं असे सांगितले जातो. मग तुम्ही जेव्हा काश्मीरमध्ये मेहबुबा फुफ्ती यांच्या मांडीला मांडी लावून बसले. तेव्हा ते काय होते. आमच्या हिंदुत्वाचे मोजमाप करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला आहे. असे म्हणत आमचे हिंदुत्व हे शेंडी जाणव्याचे नाही, मंदिरात घंटा बडवणारे हिंदूत्व आम्हाला नको, हे प्रबोधनकारांचे विचार आम्ही मानतो. असे ठाकरे म्हणाले.

हिम्मत असेल मोंदीना महाराष्ट्रात आणा : आमच्या पक्षाचे नाव चोरले, चिन्ह चोरले, आता वडील चोरण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र आम्ही कदापी होऊ देणार नाही. हिम्मत असेल तर तुम्ही मोंदीना महाराष्ट्रात आणा. मी माझ्या वडिलांचे नाव घेऊन महाराष्ट्रात येतो. सभेत वाचू का विचारणाऱ्यांना ही जनता जेव्हा मतदानासाठी उतरेल तेव्हा त्यांना कोणीही वाचवू शकणार नाही. गरज होती तेव्हा भाजपाने आम्हाला वापरुन घेतले. आता त्यांचे नामोनिशाण मिटवल्याशिवाय राहणार नाही. असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

हिम्मत असेल मोंदीना महाराष्ट्रात आणा : आमच्या पक्षाचे नाव चोरले, चिन्ह चोरले, आता वडील चोरण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र आम्ही कदापी होऊ देणार नाही. हिम्मत असेल तर तुम्ही मोंदीना महाराष्ट्रात आणा. मी माझ्या वडिलांचे नाव घेऊन महाराष्ट्रात येतो. सभेत वाचू का विचारणाऱ्यांना ही जनता जेव्हा मतदानासाठी उतरेल तेव्हा त्यांना कोणीही वाचवू शकणार नाही. गरज होती तेव्हा भाजपाने आम्हाला वापरुन घेतले. आता त्यांचे नामोनिशाण मिटवल्याशिवाय राहणार नाही. असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

कितीही यात्रा काढा, फरक पडणार नाही : चव्हाण
ही विराट सभा पाहिली की कितीही गौरव यात्रा काढा, काही फरक पडणार नाही. अदानी यांना वाचवण्यासाठी सरकार का प्रयत्न करत आहे? एवढेच राहुल गांधी यांनी विचारले होते. त्यांना लोकसभेत बोलू दिले गेले नाही. लोकशाहीची विटंबना सुरू आहे. लोकशाही टिकवायची की नाही, हा प्रश्न निर्माण झाला आहे, अशी टीका अशोक चव्हाण यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.