नगरपालिकेच्या इमारतीचा पाया खोदताना ब्रिटीशकालीन शस्त्र साठा आढळला

0

सातारा : सातारा नगरपालिकेच्या नूतन इमारतीचा पाया जेसीबीच्या सहाय्याने खोदताना तब्बल एक हजार ब्रिटिशकालीन रायफलच्या गोळ्या, दस्ता, मॅगझिनचा मोठा साठा आढळला आहे. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत सर्व साठा ताब्यात घेतला.

हा साठा लवकरच छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाकडे हस्तांतरित करण्यात येणार आहे. सातारा येथील केसरकर पेठेतील नगरपालिकेची इमारत प्रशासकीय कामकाजासाठी कमी पडू लागल्याने जिल्हा परिषदेसमोर नगरपालिकेच्या जागेत नवीन इमारतीचे काम सुरु केले आहे. याठिकाणच्या जागेची साफसफाई करुन सध्या जेसीबीच्या सहाय्याने पाया खोदण्याचे काम सुरु आहे.

हे काम सुरु असताना पुरातन काळातील रायफलींच्या गोळ्या, दस्ता, मॅगझिनचा मोठा साठा आढळला. काही क्षणातच बघ्यांची मोठी गर्दी जमली.माहिती मिळाल्यानंतर पोलिस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पुरातत्व विभागालाही याबाबत कल्पना देण्यात आली. सध्या हा साठा पोलिसांच्या ताब्यात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.