न्युयाॅर्क ः नव्या वर्षाची आनंदाची बातमी नागरिकांनी मिळाली आहे. कारण, जागतिक आरोग्य संघटना अर्थात डब्ल्यूएचओनं ‘फायझर अँड बायोएनटेक’च्या लसीला आपतकालीन वापरास मान्यता दिली आहे. जगाभरातील आपल्या कार्यालयातील संबंधित देशांशी या लसीच्या वापराबाबत चर्चा करण्यात येणार असल्याचे डब्ल्यूएचओने सांगितलेलं आहे.
डब्ल्यूएचओच्या मान्यतेमुळे फायझरच्या करोना लसीच्या वापराचा मार्ग मोकळा झालेला आहे. ही लस गरीब देशांपर्यंत लवकर पोहोचावी, यासाठी इमर्जन्सी यूज लिस्टिंग प्रोसेस सुरू करण्यात आली आहे. या सूचीमध्ये दाखल झालेले कोणतीही करोनावरील लस जगभरात वापरण्यासाठी सहजपणे मान्यता मिळणार आहे.
डब्ल्यूएचओने फायझर लसीची समिक्षा करून सांगितले की, “लसीमधून प्रभावीपणा आणि सुरक्षेसाठी आवश्यक असणारे निकष पूर्ण झाले पाहिजेत. फायझरची लस अमेरिका, ब्रिटन, युरोपीय संघात आणि इतरही देशांमध्ये वापरासाठी आधीच मान्यता दिली आहे. सर्वात पहिल्यांदा ब्रिटनमध्ये फायझर लसीला मान्यता देण्यात आली. त्यानंतर अमेरिकेने मान्यता दिली आहे.”