रत्नागिरी : चुलत भाऊ आणि कामगाराच्या मदतीने पत्नीचा गळा आवळून खून केला. खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी पेट्रोलओतून मृतदेह जाळून टाकला. त्यानंतर हाडके आणि राख पोत्यात भरून अज्ञात ठिकाणी टाकून दिले. या गुन्ह्याचा कोणताही पुरावानसताना रत्नागिरी पोलिसांनी काही दिवसातच याला वाचा फोडली. पोलिसांनी पतीसह तिघांना अटक केली आहे.
स्वप्नाली सावंतचा खून केल्याची कबूली तीन्ही संशयितांनी दिली आहे. तसेच घराच्या आवारात ज्याठिकाणी तिला जाळण्यात आलेत्याठिकाणापासून काही अंतरावर तिची 8 ते 10 अर्धवट जळालेली हाडे,राख आणि जाळलेल्या ठिकाणचा काढून टाकलेला कोबा जप्तकरण्यात पोलिसांना यश आले. यातील राख,हाडे आणि स्वप्नालीच्या मुलीची डिएनए चाचणी केलेला अहवाल काही दिवसांमध्ये प्राप्तहोणार असून या खूनाशी संबंधित अन्य पूराव्यांचा शोध आणि सखोल चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पोलिसअधिक्षक मोहित कुमार गर्ग यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या खूनाप्रकरणी पोलिसांनी स्वप्नालीचा पती सुकांत सावंत, त्याचा चुलत भाउ रुपेश सावंत आणि कामगार प्रमोद गावणंग यांना अटककेली असून ते पोलिस कोठडीत आहेत. या तिघांनी पूर्वनियोजन करुन 1 सप्टेंबर रोजी सकाळी 11.30 वा.स्वप्नालीचा गळा दोरीनेआवळून खून केला. त्यानंतर संध्याकाळ पर्यंत तिचा मृतदेह झाकून अंधार पडल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने घराच्याआवारातच पेंढा आणि पेट्रोल टाकून जाळला. जाळल्यानंतर उरलेल्या राखेची एकूण 18 पोती भरुन ती दुचाकिवरुन समुद्रात टाकली. तसेच ज्या ठिकाणी मृतदेह जाळला त्या जागेची साफसफाई करुन खालचा कोबा काढून टाकला.
आरोपींनी केलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने ठोस पुरावे शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. वरिष्ठांच्या अनुभव व मार्गदर्शनाखालीगुन्ह्याचा तपास करताना पथकाने घटनास्थळ व भोवतीचा परिसर याचे निरीक्षण व शोध करत स्वप्नालीचे नातेवाईक व आरोपींशीसंबंधित व्यक्तींकडे चौकशी केली. त्याची सांगड घालत या गुन्ह्याची उकल केली तसेच न्याय सहाय्यक तज्ज्ञांच्या मदतीने गुन्ह्याशीसंबंधित असलेले भौतिक पुरावे शोधून तपासकामी जप्त केल्याचेही गर्ग यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
या गुन्ह्याच्या तपासाची कामगिरी जिल्हा अधिक्षक मोहित कुमार गर्ग, अपर पोलिस अधिक्षक जयश्री देसाई, उपविभागीय पोलिसअधिकारी सदाशिव वाघमारे, शहर पोलिस निरीक्षक विनित चौधरी,स् थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंतकुमार शहा, पोलिसनिरीक्षक मनोज भोसले, प्रविण स्वामी, अमोर गोरे, विजय जाधव, परिवक्षाधीन पोलिस उपनिरीक्षक मीरा महामुने,सहाय्यक पोलिसफौजदार संजय कांबळे,प्रशांंत बोरकर,शांताराम झोरे,पोलिस हवालदार संदिप नाईक,जयवंत बगड,दिपक चव्हाण,प्रविण बर्गे,सचिनकामेरकर,सागर साळवी,वैभव मोरे,उमेश गायकवाड,विजय आंबेकर,बाळू पालकर,प्रसाद जाधव,निलेश कांबळे,सुभाष भागणे,महिलापोलिस हवालदार वैष्णवी यादव,पोलिस नाईक गणेश सावंत,रमीज शेख,सत्यजीत दरेकर,योगेश नार्वेकर,अमोल भोसले,आशिषभालेकर,पंकज पडेलकर,वैभव शिवलकर,विलास जाधव,वैभव नार्वेकर,निलेश कांबळे,अविनाश नवले,दत्ता कांबळे,महिला पोलिसनाईक अर्चना कांबळे,पोलिस शिपाई श्रीकांत दाभाडे,अमित पालवे,शिवानंद चव्हाण,अक्षय कांबळे आणि फॅारेन्सिक युनिटचे रामखेडेकर आदि अधिकारी आणि अंमलदार यांनी केली आहे.