मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांना देवेंद्र फडणवीस क्लिनचीट देणार का? असा कडा सवाल ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी उपस्थित केला आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणीस यांनी करुणा शर्मा ते पुजा चव्हाण असो की सोलापुरातील देशमुख प्रकरण असो कुणालाच न्याय दिला नाही, असा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.
महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात झाली आहे. आज अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. त्यातच भाजपा नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांचा कथित अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे मोठा गजहब माजला आहे. यावर बोलताना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी अनेक सवाल उपस्थित केलेत.
ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव म्हणाले की, किरीट सोमय्यांनी देवेंद्र फडणवीसांकडे आपली चौकशी करण्याची मागणी केली आहे. जे किरीट सोमय्या लोकांचया चौकशी करा म्हणते त्यांची सीबीआयमार्फत किंवा अन्य कुठल्या उच्च एजेन्सीकडे चौकशी देणार का असा सवाल उपस्थित केला आहे. भाजपने संपूर्ण देशामध्ये कोणी कुठले कपडे घालावे, भाजपने मांडलेली भूमिकेविरोधात जर आपले मत मांडले तर तो राष्ट्रविरोधी आहे, म्हणत त्यांच्यावर देशद्राहाचा गुन्हा दाखल करण्यात येतो. त्याला पाकिस्तानला घालवा असे काही मापदंड घालून दिले आहेत.किरीट सोमय्या एक भाजपचा मापदंड आहे का? असा प्रश्न ही त्यांनी उपस्थित केला आहे. त्यांची कृती ही त्याचा मापदंड आहे का?, ज्या पद्धतीने धनंजय मुंडेंच्या बाबतीत करुणा शर्मांना देवेंद्र फडणवीसांकडून न्याय मिळाला नाही, संजय राठोड यांना तर पुजा चव्हाण प्रकरण होऊन देखील मंत्रीपद देण्यात आले.
राहुल शेवाळे प्रकरण असो की सोलापुरातील देशमुख प्रकरणात महिलांना न्याय मिळाला नाही. महायुतीकडून किंवा देवेंद्र फडणवीस यांच्याकडून या कोणत्याच प्रकरणात महिलांना न्याय मिळाला नाही. मग आता देवेंद्र फडणवीस किरीट सोमय्यांना क्लिनचीट देतील का?,असा सवाल भास्कर जाधव यांनी उपस्थित केला आहे.