महिला प्रमियम लीग : ट्रेंड मध्ये विदेशी खेळाडू

0

मुंबई : महिला प्रीमियर लीगमध्ये जवळपास एक तृतीयांश सामने झाले आहेत. अनेक क्रिकेटतज्ज्ञांच्या मते, ही लीग क्रिकेटमध्ये अनेक बदल घडवेल. असेच मत ऑस्ट्रेलियाची यष्टिरक्षक फलंदाज एलिसा हिली हिचेदेखील आहे. तिने लीग सुरू होण्यापूर्वीच या स्पर्धेला गेमचेंजर ठरेल म्हणून जाहीर करून टाकले होते. अशात पाहूयात महिला प्रीमियर लीगच्या गत एक आठवड्यामध्ये कोणत्या प्रकारचा ट्रेंड पाहायला मिळाला आहे.

लीगमध्ये सर्वाधिक धावा ऑस्ट्रेलियाची कर्णधार मेग लेनिंगने केल्या आहेत. तिने ३ सामन्यांत १८५ धावा केल्या. लीगमध्ये आतापर्यंत सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत भारतीय खेळाडू पिछाडीवर आहेत. लीगमध्ये हरलीन देओल भारताकडून सर्वाधिक धावा करणारी फलंदाज आहे. तिने ३ सामन्यांत १४३ च्या स्ट्राइक रेटने ११३ धावा काढल्या. मात्र, लीगमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या अव्वल-५ फलंदाजांमध्ये भारताची एकही फलंदाज नाही.

हरलीन या यादीत सहाव्या क्रमांकावर आहे. अव्वल-१० मध्ये ३ भारतीय आहेत. सातव्या स्थानावर १०३ धावा करणारी शेफाली वर्मा व १० व्या स्थानावर २ डावात ८१ धावा करणारी जेमिमा रॉड्रिग्ज आहे. मुंबई इंडियन्सच्या शाइका इशाक आपली छाप सोडली.

आकड्यांनुसार, यंदाच्या लीगमध्ये सर्वात मजबूत संघ मुंबई इंडियन्स दिसतोय. मुंबई इंडियन्सविरुद्ध अद्याप एकही संघ २० षटके खेळू शकला नाही. लीगच्या पहिल्या सामन्यात मुंबईने गुजरात जाएंट्सला १५.१ षटकांत ६४ धावांवर गुंडाळले. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मुंबईविरुद्ध १५५ धावा काढल्या, मात्र तेदेखील हरमनप्रीत कौरच्या गोलंदाजीपुढे १८.४ षटके टिकू शकले. मुंबईचा तिसरा सामना सलग २ सामने जिंकणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सशी झाला. दिल्लीने मुंबई विरुद्ध मैदानात उतरण्यापूर्वी आपल्या दोन्ही सामन्यात २० षटकांत २००+ धावांचा आकडा गाठला होता, मात्र मुंबईचे गोलंदाज दिल्लीवर वरचढ ठरले. मुंबईने दिल्लीला केवळ १०५ धावांवर १८ षटकांत रोखले.

महिला प्रीमियर लीगमध्ये आयपीएलच्या पहिल्या सत्राप्रमाणे एकतर्फी सामने पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत झालेल्या ८ सामन्यांत गुजरात व यूपी यांच्यातील सामना एकतर्फी झालेला नाही. या सामन्यात ग्रेस हॅरिसने अखेरच्या षटकात यूपीला विजय मिळवून दिला. लीगचा पहिला सामना गुजरातने १४३ धावांनी गमावला. ८ पैकी ३ सामन्यांतील लक्ष केवळ १५ षटकांत गाठले. ४ पैकी ३ वेळा २००+ धावसंख्येचा पाठलाग करणारा संघ ४०+ धावांनी पराभूत झाला.

 

Leave A Reply

Your email address will not be published.