लेखक सलमान रश्दी यांच्यावर चाकू हल्ला करुन हत्या

0

न्यूयॉर्क : बुकर पुरस्कार विजेते भारतीय वंशाचे लेखक सलमान रश्दी यांच्यावर शुक्रवारी न्यूयॉर्कमध्ये चाकू हल्ला झाला. रश्दी बफेलोनजीक चौटाउक्वा संस्थेत व्याख्यान देणार होते. मंचावर परिचय देत असताना हल्लेखोराने त्यांच्या गळ्यावर 20 सेकंदात 15 वार करून ठोसे मारले. यात त्यांचा मोठा रक्तस्त्राव झाला. 75 वर्षीय रश्दींना रुग्णालयात दाखल केले आहे. पोलिसांनी हल्लेखोराला ताब्यात घेतले आहे.

1988 मध्ये “सॅटनिक व्हर्सेस’ वरून त्यांच्याविरुद्ध फतवा निघाला व हत्येची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर 2000 पासून रश्दी अमेरिकेत वास्तव्यास आहेत.

हल्लेखोराला पोलिसांनी अटक केली आहे. त्याचे वय 25 वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याने हल्ला का केला किंवा कोणाच्या आदेशावर हा हल्ला केला, याबाबत पोलिसांनी कोणतीही माहिती दिलेली नाही.

रश्दी यांचा जन्म मुंबईत झाला. द सॅटॅनिक व्हर्सेस आणि मिडनाईट चिल्ड्रन यांसारखी पुस्तके लिहून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या रश्दी यांना बुकर पुरस्कार मिळालेला आहे. आपल्या कांदबऱ्या तसेच त्यामुळे निर्माण होणाऱ्या वादामुळे रश्दी नेहमी चर्चेत असतात. दरम्यान, आज त्यांच्यावर हल्ला नेमका कोणत्या कारणामुळे झाला. हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.