”सोनिया गांधींपुढे आज यक्षप्रश्न पूत्र की लोकशाही…”
शिवानंद तिवारी मांडले स्पष्ट मत ः आज काॅंग्रेसची महत्वाची बैठक
पाटणा ः काॅंग्रेस पक्षाचा उत्तराधिकरी निवडाना पुत्रप्रेमाचा त्याग कारावा, असा सल्ला बिहारमधील विरोध पक्षांचे महाविकास आघाडीचे नेतृत्व करणारे ज्येष्ठ नेते शिवानंद तिवारी यांनी काॅंग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांना दिला आहे.
बिहारमधील विरोधकांच्या महाविकास आघाडीत काॅंग्रेसदेखील एक पक्ष आहे. तिवारी म्हणाले की, आज काॅंग्रेसची बैठक आहे. त्यात निर्णय काय होईल माहीत नाही. काॅंग्रेसची स्थिती ही नावाडी नसलेल्या नावेसारखी झालेली आहे. त्याला कोणीच वाली उरलेला नाही. राहूल गांधी यांच्याकडे लोकांना उत्साहीत करण्याची क्षमता नाही, हे स्पष्टच झालेले आहे. जनतेचं सोडून त्यांच्याच पक्षातील लोकांना त्यांच्यावर विश्वास नाही. याच कारणामुळे लोक काॅंग्रेसपासून दूर चालले आहेत.”
”आज सोनिया गांधींसमोर यक्ष प्रश्न आहे… पक्ष की मुलगा किंवा आपण म्हणू शकतो की, पूत्र की लोकशाही. काॅंग्रेस पक्षाची आज महत्वाची बैठक होत आहे. माझे म्हणणे त्यांच्यापर्यंत पोहोचेल की नाही मला माहीत नाही. मात्र, देशापुढे आज ज्या प्रकारचे संकट दिसत आहे, तेच माझे म्हणणे पुढे मांडण्यासाठी हतबल करत आहेत.”