जळगाव : २६ वर्षीय तरूणाने आपल्या व्हाट्सअॅपवर बाय असे स्टेटस ठेवत राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली.
प्रेमविवाह झालेल्या या तरुणाची पत्नी कौटुंबिक वादामुळे माहेरी गेली आहे. याच नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केली असावी असा अंदाज आहे.
अतुल रमेश पाटील (२६ जय भवानी, कॉलनी मेहरूण) असे मृत तरुणाचे नाव आहे.
कौटुंबिक कारणावरून पत्नी वर्षा मुलाला घेवून माहेरी निघून गेल्या आहेत. दोघांनी तीन वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला होता. अतुल पाटील याने राहत्या खोलीत दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे उघडकीला आले आहे.
अतुलने आत्महत्या केल्याची माहिती काका शांताराम माणिक पाटील यांनी कळविल्यानंतर त्यांनी जिल्हा रूग्णालयात धाव घेतली. वैद्यकिय अधिकारी डॉ. प्रविण पाटील यांच्या खबरीवरुन एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.