पुणे : पुणे- नगर महामार्गावर लोणीकंद गावाजवळ अज्ञात इसमांने एका तरुणावर गोळीबार केल्याची घटना मंगळवारी (दि. 9) घडली आहे.
पुणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून गोळीबाराच्या घटना वाढत आहेत. गेल्या महिनाभरातील गोळीबाराची ही तिसरी घटना आहे. आता ही भरदुपारी गोळीबाराची घटना घडल्याने लोणीकंद परिसरात गुंडांची दहशत पसरली आहे.
सचिन शिंदे असे गोळीबारात जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्याची प्रकृती गंभीर आहे. त्याला उपचारासाठी खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून आरोपीची शोध मोहीम सुरु केली आहे.