या दोघांनी आणखी २० महिलांना पोर्ट ब्लेअर इथल्या निवासस्थानी नेले होते, अशी माहिती चौकशीतून समोर आली आहे. त्यातल्या काहींना सरकारी नोकरीही देण्यात आली होती.
नवी दिल्ली : नोकरीच्या बदल्यात शारीरिक शोषण केल्या प्रकरणी अंदमान निकोबारचे निलंबित माजी मुख्य सचिव जितेंद्र नरेन आणि कामगार आयुक्त आर. एल. ऋषी यांच्या अडचणीत सोमवारी आणखी वाढ झाली.
विशाखा मार्गदर्शक तत्त्वांनुसार या प्रकरणात आणखी एका महिलेने तक्रार नोंदवली आहे. ती विशाखा समितीला पाठवण्यात आल्याची माहिती अंदमानमधल्या प्रशासकीय सेवेकडून देण्यात आली. या दोघांवर सामूहिक बलात्काराचा खटला दाखल झाल्यानंतर ही तक्रार आली असली तरी त्या महिलेची बाजू एकून घेऊन पुढील कारवाई केली जाणार आहे.