महाड तालुक्यात दरड कोसळून 32 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकल्याची भीती

0
रायगड : राज्याला पावसाने झोडपून काढले आहे.मात्र रायगडमध्ये पावसाने हाहाःकार माजवला आहे. या परिसरात दरड कोसळून 32 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर येत असून अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची समजत आहे. महाड तालुक्यातील तळई गावात ही भीषण दुर्घटना घडली. तुफान पावसामुळे 35 घरांवर दरड कोसळली. या भीषण दुर्घटनेनंतर NDRF कडून बचावकार्य सुरु आहे.
गुरुवारी दुपारी 4 वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडल्याची माहिती आहे. महाड तालुक्यातील तळई गाव हे डोंगर कपारीमध्ये वसलेले आहे. या गावावर दरड कोसळल्याने दरडीखाली 35 घरे दबली गेली. दरड कोसळण्याची घटना घडताच स्थानिकांनी धाव घेऊन मदत कार्यास सुरुवात केली. स्थानिकांनी मातीच्या ढिगाऱ्याखालून 32 जणांचे मृतदेह बाजूला काढले. तर 80 ते 85 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र पावसामुळे मदत कार्यास अडथळा निर्माण होत आहे.
गेल्या आठवड्याभरापासून महाडमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे दाणादाण उडाली आहे. या पावसामुळे महाडच्या तळई गावात 35 गावात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत 32 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण मातीच्या ढिगाऱ्याखाली दबले गेले आहेत. एनडीआरएफ आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने या ठिकाणी बचाव कार्य सुरू करण्यात आलं आहे.
एवढी मोठी दुर्घटना घडूनही प्रशासन संवेदनशील नाही. सरकार भावनाशून्य झालंय. शासनाच्या ही अशी निगरगट्ट यंत्रणा मी माझ्या आयुष्यात पाहिलेली नाही, अशा शब्दात विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी आपला संताप व्यक्त केला. माझी शासनाकडे विनंती आहे की या घटनेकडे गांभीर्याने बघून त्वरित मदत कार्य सुरू करा, अशी मागणी दरेकर यांनी केली.
Leave A Reply

Your email address will not be published.