काबूल : काबूल विमानतळावर चेंगराचेंगरी झाली आहे. यामध्ये अफगाणिस्तानातील सामान्य नागरिक ठार झाल्याचं वृत्त आहे. रविवारी ब्रिटिश लष्कराने जारी केलेल्या निवेदनानुसार आंतरराष्ट्रीय विमानतळावर चेंगराचेंगरीत सात अफगाण नागरिक ठार झाले आहेत.
लष्करानं म्हटलं आहे की, तालिबान्यांच्या तावडीतून सुटण्यासाठी देश सोडून जाणाऱ्या लोकांना अजूनही धोका असल्याचे दिसून आले आहे. यूकेच्या संरक्षण मंत्रालयाने एक निवेदन जारी करून असे म्हटले आहे की, विमानतळावरील परिस्थिती अत्यंत आव्हानात्मक आहे. मात्र आम्ही परिस्थिती सामान्य करण्यासाठी आणि लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. गेल्या रविवारी काबूलवर तालिबाननं कब्जा केल्यानंतर विमानतळावर मोठ्या संख्येनं लोकं गर्दी करु लागले होते.
म्हणून हा ब्रिटीश नागरिक अफगाणिस्तान सोडायला नाही तयार; कारण वाचून वाटेल अभिमान काबूल विमानतळावर हल्ला होण्याची शक्यता आता अमेरिकेनं दिलेल्या इशाऱ्यामुळे लोकांची चिंता आणखीनच वाढली आहे. अमेरिकेनं आपल्या नागरिकांना इशारा दिला आहे. या इशाऱ्यात अमेरिकेनं म्हटलं आहे की, काबूल विमानतळाजवळ येऊ नका. काबूल विमानतळावर इस्लामिक स्टेट हल्ला करण्याची भीती त्यांना सतावतेय.
अशा परिस्थितीत त्यांनी आपल्या नागरिकांना आधीच सतर्क केले आहे. काबूल विमानतळावर सतत गोंधळ सुरूच आहे. देश सोडण्यासाठी हजारो लोकं विमानतळावर गर्दी करत आहेत. त्यांच्या नियंत्रणासाठी अमेरिकन सैन्य तैनात आहे.