मुंबई : राज्याच्या राजकारणात मोठी घडमोड घडली आहे. शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीमध्ये मोठी फूट पडलेली असून राष्ट्रवादीचे नेतेअजित पवार एका गटासह सत्ताधारी पक्षासोबत गेले आहेत. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे.
राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये पवार आणि राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांनी शपथ घेतली .
मंत्रीपदाची शपथ घेतलेले आमदार….
छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, आदिती तटकरे, अनिल भाईदास पाटील, बाबुराव अत्राम आणि संजयबनसोडे.
अजित पवार यांच्या बैठकीला उपस्थित असलेले आमदार….
दिलीप वळसे पाटील
छगन भुजबळ
हसन मुश्रीफ
किरण लहमाटे
सरोज अहिरे
अशोक पवार
अनिल पाटील
सुनिल टिंगरे
अमोल मिटकरी दौलत दरोडा
अनुल बेणके
रामराजे निंबाळकर
धनंजय मुंडे
निलेश लंके
मकरंद पाटील