कोरोना : राज्यातील पाच जिल्हे ‘हॉट स्पॉट’

0

मुंबई : मुंबई, पुणे, नागपूर, अमरावती आणि ठाणे या प्रमुख पाच जिल्ह्यांत काेराेनाचे नवे रुग्ण आढळण्याचे प्रमाण ६५ टक्के आहे. त्यामुळे या पाच जिल्ह्यात भितीचे वातावरण असून प्रशासन उपाय योजना राबवत आहे.

मुंबईतील रुग्ण दुपटीच्या कालावधीत घट झाली आहे. १५ फेब्रुवारी रोजी ताे ४५५ दिवस होता, तर २१ फेब्रुवारी रोजी ३७१ दिवसांवर आल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये राष्ट्रीय पातळीवरील तुलना करता मुंबईत कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग दिसून येत होता. सध्या मुंबईत २२ फेब्रुवारीपर्यंत एकूण ३ लाख १९ हजार ८८८ कोरोनाबाधित असून बळींचा आकडा ११ हजार ४४६ आहे. उपचाराधीन रुग्णांची संख्या ७ हजार ३९७ आहे.

कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढत असल्याने महापालिकेने सर्व कोविड काळजी केंद्रे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.