हरुण अहवाल आणि ग्रॅही इंडियाने मंगळवारी ग्रॅही हुरुन इंडिया रियल इस्टेट रिच लिस्ट 2020 जाहीर केलं आहे. या यादीत केवळ 300 कोटी संपत्ती असलेल्या लोकांनाच यात सामाविष्ट केलं जात होतं. मात्र, मागील वर्षी सुरू असलेल्या कोरोना महामारीमुळे सर्व्हे करणार्यांनी याचा आकडा 300 कोटी वरून 250 कोटीवर आणला. त्यामुळे या यादीत 2020 मध्ये 250 कोटी संपत्ती असलेल्या लोकांनाही समाविष्ट करून घेतले आहे. तसेच त्यांचा या व्यावसायाशी संबंध तपासला आहे.
2019 प्रमाणे यावेळेसही, लोढा डेव्हलपर्सचा मंगल प्रभात लोढा Mangal Prabhat Lodha (वय 65) आणि त्याचे कुटुंब हे देशातील रिअल इस्टेट क्षेत्रातील सर्वात श्रीमंत उद्योजक म्हणून ओळखले गेले आहेत. सन 2019 मध्ये 31,960 कोटी रुपये लोढा यांची एकूण मालमत्ता होती. ती संपत्ती वाढून आता 44,2700 कोटी रुपये इतकी झाली आहे. तरीही, देशातील सर्वात श्रीमंत उद्योजकांच्या यादीत लोढा पहिल्या क्रमांकावर आहे.
सन 2020 मध्ये त्यांची संपत्ती 39 टक्क्यांनी वाढली आहे. या यादीत डीएलएफचे राजीव सिंह आणि के रहाजा ग्रुपचे चंद्रू रहेगा आणि फॅमिली तिसर्या क्रमांकावर आहेत. या वेळी पहिल्या 10 मध्ये रिअल इस्टेट क्षेत्रातील 10 श्रीमंत उद्योजकांपैकी 7 जण मुंबईचे आहेत. तर सन 2019 मध्ये मुंबईतील 6 उद्योजक होते.
लोढा भारतातील सर्वात मोठा रिअल इस्टेट डेव्हलपर ग्रुप :
अहवालानुसार, मंगल प्रभात लोढा आणि मॅक्रिटेक डेव्हलपर्स (जुने नाव लोधा डेव्हलपर्स) यांचे कुटुंबही आता 44,270 कोटी रुपयांच्या संपत्तीसह पहिल्या क्रमांकावर आहे. 1980 मध्ये स्थापन झालेली लोढा Mangal Prabhat Lodha हे मुंबईत मुख्यालय असलेले भारतातील सर्वात मोठे रिअल इस्टेट डेव्हलपर आहे. या यादीत असे म्हटले आहे की, लोढा समूहाने भारतातील साथीच्या (भांडवलाच्या) भूसंपत्तीच्या विकासात केलेल्या कामांमुळे इतर कोणत्याही गटापेक्षा जास्त महसूल मिळविला आहे.