छत्तीसगडमध्ये नक्षलवादी-जवानांमध्ये चकमक; 20 जवान शहीद

0
रायपूर : छत्तीसगडमधील बीजापूर आणि सुकमा sukma जिल्ह्यात शुक्रवारी रात्री केंद्रीय राखीव पोलिस दलातील कोब्रा बटालियन, डीआरजी आणि एसटीएफच्या संयुक्त दलाला नक्षल विरोधी पथकाच्या मोहीमेस पाठवण्यात आले होते. यावेळी सुकमा जिल्ह्यात नक्षलवादी आणि जवानांमध्ये झालेल्या चकमकीत 20  जवान शहीद झाले. दरम्यान यावेळी  जवान बेपत्ता झाले आहेत. अद्यापपर्यंत हे जवान मिळून आले नाहीत.

नक्षल ऑपरेशन्सचे पोलिस उपमहानिरीक्षक ओ. पी. पाल यांनी दिलेल्या माहितीनुसार बीजापूर जिल्ह्यातील तर्रेम, उसूर आणि पामेड तर सुकमा sukma जिल्ह्यातील मिनपा आणि नरसापूरम या परिसरात नक्षल विरोधी अभियान राबवण्यात आले. या मोहिमेत जवळपास दोन हजार जवान सहभागी झाले होते. सुकमा जिल्ह्यातील चकमक सुमारे तीन तास सुरु होती. यामध्ये 20 जवानांना वीरमरण आले आहे, तर 12 जखमी झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चकमकीनंतर जवान बेपत्ता झाले आहेत. त्याचा शोध सुरु आहे. शहीद झालेल्या जवानांचे मृतदेह मिळाले आहेत. त्याचबरोबर नक्षलवादी आणि जवानांच्या झालेल्या झटापटीत 12 जवान जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी बिजापूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर 7 गंभीर जखमी जवानांवर रायपूरच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.