सर्वांच्या पुनरवसनाची व्यवस्था तत्काळ करावी : उध्द्वव ठाकरे
दुर्घटनाग्रस्त इरशाळवाडीला ठाकरे यांची भेट
रायगड : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज इरशाळवाडीला भेट देण्यासाठी पोहोचले आहेत. पंचायतन मंदिरात त्यांनी स्थानिक ग्रामस्थांशी संवाद साधला. ते इरशाळवाडीतील नुकसानग्रस्त परिसराची ते पाहणी केली. या आधी आमदार आदित्य ठाकरे यांनी या भागाचा दौरा केला होता.
इरसाळवाडीमधील घटना ही महाराष्ट्रातील राजकारण्यांसाठी लाजीरवाणी असल्याचे मत उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. सरकार कोणाचेही असो, मी सरकारकडे जनता म्हणून पाहतो, असेही ते म्हणालो. केवळ इरसाळवाडीच नव्हे तर आजूबाजूच्या सर्व वस्त्यांनी एकत्र करुन सर्वांच्या पुर्नरवसनाची व्यवस्था करण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले. दुर्घटना झाल्यावर आपण धावपळ करतो मात्र, आधीच प्रयत्न करण्याची आवश्यकता असून याकडे प्राथमिकतेने लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे ठाकरे म्हणाले.
इरसाळवाडीच्या नागरिकांनी एकत्र राहून संकटाचा सामना करावा आम्ही त्यांचे पुनर्वसन होईपर्यंत त्यांची साथ सोडणार नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. हे संकट पुन्हा उभे राहू नये, यासाठी योग्य त्या उपाय-योजना करण्याची आवश्यकता असल्याचेही ते म्हणाले. मी राजकारण करणार नाही मात्र, तुम्हाला पूर्ण मदत करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले.
इरशाळवाडीतील दुर्घटनेनंतर बचाव कार्य अजूनही सुरू आहे. येथील मृतांची संख्या आता 24 झाली असून अजूनही 102 नागरिकांचा शोध लागलेला नाही. शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी इरशाळवाडी येथील दुर्घटनाग्रस्त वाडीला भेट दिली. इरशाळवाडी जवळील पंचायत मंदिर नढाळ पासून पाच किलोमीटर वर बचावलेल्या ग्रामस्थांना ठेवण्यात आले आहे. तिथे उद्धव ठाकरे पोहोचले आहेत.