एकाच कुटुंबातील 6 जणांना कोरोनाची लागण; डेल्टा प्ल्सचे संशयित, नमुने तपासणीला

0

नागपूर :  नागपुरात पुन्हा कोरोना रुग्णसंख्येने उसळी घेतली आहे. एकाच कुटुंबातील 6 जणांची कोरोना चाचणी सकारात्मक आली आहे. तसंच डेल्टा प्ल्सचे संशयित म्हणून त्यांचे नमुने चाचणीसाठी हैदराबादला पाठवण्यात आले आहेत. सलग दोन महिन्यानंतर कोरोनामुक्तांपेक्षा नव्या रुग्णांची संख्या जास्त असल्याचं आढळून येत आहे.

कोरोना रुग्णांची मंदावलेली संख्या नागपूरकरांसाठी दिलासादायक गोष्ट मानली जात होती. मात्र दोन महिन्यानंतर आता पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले आहे. एकाच कुटुंबातील सहा जणांना कोरोनाची लागण झालीय.

त्यात भरीस भर म्हणजे डेल्टा प्लसचे संशयित म्हणून त्यांचे नमुने चाचणीसाठी हैदराबादला पाठवण्यात आले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून त्या सहाही जणांना आमदार निवासात क्वारंटाईन करण्यात आलं आहे. या सहा जणांची पुणे प्रवासाची पार्श्वभूमी आहे. त्यामुळे नागपूरकरांमध्ये धाकधूक आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या मंदावली होती. मात्र आता पुन्हा एकदा कोरोनाने उसळी घेतल्याचे चित्र आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सर्वाधिक रुग्णांची नोंद 24 एप्रिल रोजी झाली होती. त्यावेळी एकाच दिवसांत जवळपास आठ हजार रुग्णांची भर पडली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.