मुख्याध्यापकाचा शाळेतच डर्टी पिक्चर

0

बुलढाणा : शाळेत काम असल्याचे सांगून महिलेला बोलावून घेत तिच्यासोबत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार बुलढाण्यात उघडकीस आला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील एका जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकाने हे कृत्य केले आहे. मुख्याध्यापकाने पीडित महिलेला शाळेत बोलावून घेतले. याठिकाणी कुणी नसल्याचे पाहून तिच्यासोबत अश्लील चाळे करुन अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला.

यावेळी घाबरलेल्या महिलेने आरोपीच्या तावडीतून कशीबशी सुटका करुन घेत थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा पोलिसांनी मुख्यापकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

अद्याप आरोपीला अटक करण्यात आली नसून घटनेचा तपास केला जात आहे.
रुस्तम रामभाऊ होनाळे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या मुख्याध्यापकाचे नाव आहे.

आरोपी होनाळे हा नांदुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निमगाव येथील जिल्हा परिषदेच्या मराठी प्राथमिक कन्या शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहे.

पीडित महिला याच शाळेत शालेय पोषण आहार बनवण्याचे काम करते. घटनेच्या दिवशी शाळेत कुणीही नव्हतं. याचा फायदा घेऊन आरोपीनं शाळेत काम असल्याचे सांगून पीडित महिलेला बोलावून घेतलं.

काही कार्यालयीन काम असल्याचे सांगून महिलेला शाळेत बोलावून घेतले. यावेळी शाळेत कोणी नसल्याचा गैरफायदा घेत आरोपीने महिलेसोबत अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केला.

या प्रकारामुळे घाबरलेल्या महिलेने आरोपीच्या तावडीतून सुटका करुन घेत पोलीस ठाण्यात धाव घेतली. पुढील तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, शाळेच्या मुख्याध्यपकाने शालेय पोषण आहार बनवणाऱ्या महिलेचा विनयभंग केल्याने शाळा प्रशासनात खळबळ उडाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.