सांगोल्याचे माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे निधन

0
सोलापूर : शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते सांगोल्याचे माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास निधन झाले. सोलापुरातील खासगी रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मृत्यूसमयी ते ९४ वर्षाचे होते.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्य़ातील सांगोला मतदारसंघातून ११ वेळा ते विजयी झाले होते. आमदार गणपतराव देशमुख हे सलग 54 वर्षे विधानसभेचे सदस्य होते. एकाच पक्षात राहून एकाच मतदार संघातून सलग 11 वेळा निवडून येण्याचा विक्रम त्यांच्या नावावर नोंदला गेला आहे. याची गिनीज बुकात देखील नोंद झाली आहे.
1962 ते 1995 पर्यंत ते सलग आमदार म्हणून निवडून आले. रोजगार हमी मंत्री असताना गणपतराव देशमुख यांनी दुष्काळी सांगोला तालुक्याला डाळिंबा सारख्या पिकाची लागवड करण्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहान दिले. त्यांच्या प्रयत्नामुळेच सांगोल्याची देशात वेगळी ओळख निर्माण झाली आहे.
सत्वशील, चारित्र्यसंपन्न, निष्कलंक अशी त्यांची आजही राज्यभरात ओळख आहे. सोलापूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्राच्या वाटचालीत त्यांचा मोलाचा वाटा आहे. देशातील पहिली महिलांसाठीची सुतगिरणी देखील त्यांनीच सुरु केली. पाणी, रोजगार आणि शेती या क्षेत्राशी त्यांचा मोठा व्यासंग आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.