पुणे ते बेंगळुरू दरम्यान सहा लेनचा नवीन ग्रीन फिल्ड महामार्ग

0

पुणे : ‘पुणे ते बेंगळुरू दरम्यान सहा लेनचा नवीन ग्रीन फिल्ड महामार्ग बांधण्यात येणार आहे. हे अंतर ८४५ किलोमीटर आहे. मात्र, नवीन महामार्गामुळे ते केवळ ६९५ किलोमीटरचे असेल. जवळपास १५० किलोमीटर अंतर वाचणार आहे. या रस्त्यावर वाहने ताशी १२०च्या वेगाने धावू शकतील’, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी दिली.

खंबाटकी घाटातील प्रत्येकी तीन मार्गिकांच्या जुळ्या बोगद्यांचे खोदकामाचे काम पूर्ण झाले. या खोदकाम पूर्ण करण्याच्या कामासाठी गडकरी ऑनलाइन स्वरूपात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ‘पुणे-बेंगळुरू नवीन महामार्ग सध्या सहा लेनचा प्रस्तावित आहे. भविष्यात त्याची रुंदी आणखी वाढविणे शक्य आहे. त्याची अलाइनमेंट जवळपास निश्चित झाली आहे. या प्रकल्पासाठी ४८ हजार कोटी रुपये निधी लागणार आहे’, असे गडकरी यांनी सांगितले.

‘पुणे-सातारा मार्गावर वाहतुकीची अडचण येत होती. त्यामुळे एक बोगदा बांधला. या रस्त्याच्या माध्यमातून कर्नाटक, केरळकडे जाणाऱ्यांची सोय झाली. मात्र, एस वळणामुळे अनेक अपघात झाले. त्यामुळे उपाययोजनेची गरज निर्माण झाली. त्यातून दोन नवीन बोगद्यांची निर्मिती करण्यात येत आहे. या बोगद्यांमुळे आता वाहतुकीला, दळणवळणाला चालना मिळणार आहे’, असे पालकमंत्री पाटील म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.