नवी दिल्ली : गेल्या वर्षापासून थौमान घातलेल्या कोरोना व्हायरसचे प्रमाण काही प्रमाणात कमी होत होते. मात्र आता पुन्हा पॉझिटिव्ह संख्येत वाढ होऊ लागल्याने गुजरात राज्यातील काही शहरांमध्ये 28 फेब्रुवारीपर्यंत नाईट कर्फ्यू लावण्यात आला असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
परंतू यावेळी काही नियम शिथील करण्यात आले आहेत. अहमदाबाद, सूरत, वडोदरा आणि राजकोटमध्ये कर्फ्यू रात्री 11 पासून ते सकाळी 6 वाजेपर्यंत असणार आहे. नाईट कर्फ्यूचा हा चौथा विस्तार आहे. गेल्या वर्षी दिवाळीनंतर या शहरांमध्ये कोरोना रूग्णांच्या संख्येत तीव्र वाढ झाल्यावर नोव्हेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत कर्फ्यू लागू करण्यात आला होता.
अधिकारी म्हणाले की, नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये दररोज सरासरी 1 हजार 500 नव्या कोरोना रूग्णांची वाढ नोंदवली जात होती, तर आता दररोज सुमारे 250 कोरोना रूग्ण अढळून येत आहेत. सकरार अनेक योजना राबवून कोरोनाची साखळी तोडण्याचा प्रयत्न करत आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात देखील 28 फेब्रुवारी पर्यंत नाईक कर्फूची घोषणा करण्यात आली आहे. शिवाय पुन्हा लॉकडाऊन लागण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. अधिकाधिक लोकांना तपासणीसाठी येत असल्यामुळे संसर्ग होण्याच्या नवीन घटनांमध्ये वाढ होत असल्याची माहिती जिल्हा न्यायाधीश शैलेश नवल यांनी दिली आहे.