रशियाला धोका असेल तर अणुहल्ला करू; अमेरिकेला थेट धमकी

0

रशिया : रशिया-युक्रेन युद्धादरम्यान रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी अण्वस्त्र हल्ल्याची धमकी दिली आहे. देशाला संबोधित करताना पुतीन यांनी अमेरिकेसह पाश्चात्य देशांना धमकी देत म्हटले की, कोणीही अण्वस्त्र हल्ल्याच्या इशाऱ्याकडे कानाडोळा करू नये.

ते म्हणाले- पाश्चात्य देश रशियाला नष्ट करून कमकुवत करण्याचे षडयंत्र रचत आहेत. या देशांनी आता मर्यादा ओलांडली आहे. आता रशियाला धोका निर्माण झाला तर आम्हीही अण्वस्त्र हल्ला करू. आण्विक इशारा हे काही नाटक नाही.

आपल्या भाषणादरम्यान पुतीन यांनी युक्रेनमध्ये सैन्य वाढवण्याचा आग्रह धरला. लष्कराच्या जमवाजमवीबाबतच्या फर्मानावर त्यांनी स्वाक्षरी केली आहे. याअंतर्गत रशिया 3 लाख राखीव सैनिक गोळा करत आहे. खरे तर पुतीन यांनी रशियाची लष्करी ताकद वाढवून युक्रेनचा डॉनबास ताब्यात घेण्याची तयारी तीव्र केली आहे. डॉनबास व्यतिरिक्त रशिया युक्रेनच्या खेरासन आणि झापोरिझियाला आपला भाग म्हणून जोडण्याचा प्रयत्न करत आहे. पुतीन यांनी या भागात सार्वमत घेण्याचे आदेश दिले आहेत.

अशा परिस्थितीत येत्या काही दिवसांत डोनेस्तक, लुहान्स्क, खेरासन आणि झापोरिझिया येथे राहणारे लोक रशियामध्ये सामील होण्यासाठी मतदान करतील. या भागात रशियन भाषक लोकांची संख्या खूप जास्त आहे. येथे रशियाचा ताबा म्हणजे युक्रेनचा आर्थिक विनाश आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.