सांगोला : योगा दिनाचे औचित्य साधून सोलापूर जिल्ह्यातील, सांगोला तालुक्यातील यलमार मंगेवाडी गावात योगा दिन साजरा करण्यात आला.
सोलापूर सोशल फाऊंडेशनच्या उपक्रमाअंर्तगत गावातील हनुमान मंदिरासमोर गावकऱ्यांनी योगाच्या उपक्रमात सहभाग घेतला.
या कार्यक्रमाचे उदघाटन ग्रामपंचायत सदस्य कैलास येलपले यांच्या हस्ते करण्यात आले. कोरोना नियमांचे पालन करून, सर्व खबरदारी घेऊन हा कार्यक्रम करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी योग टिचर म्हणून लाभलेले श्री श्री श्री रविशंकर यांचे शिस्य बेंगलोर येथिल रविंद्र घाटूळे यांनी सर्व योगासने प्राणायाम यांचे मार्गदर्शन केले. तसेच गावकऱ्यांकडून योगा करून घेतला.