PFI संघटनेवर पुणे, नवी मुंबई आणि मालेगावमध्ये छापे

0

नवी दिल्ली : वादग्रस्त संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया आता तपास यंत्रणा एनआयए आणि ईडीच्या निशाण्यावर आली आहे. तब्बल 13 राज्यांमध्ये PFI च्या शंभरहून अधिक ठिकाणांवर ही छापेमारी सुरू आहे.

महाराष्ट्रात मुंबईसह पुणे, मालेगावमध्ये ईडी आणि एएनआयने छापे टाकले आहे. या प्रकरणात आतापर्यंत 20 जणांना अटक करण्यात आली आहे. पीएफआय संदर्भात पुण्यात चार ठिकाणी छापेमारी सुरू आहे. पीएफआयचे नेते रझी अहमद खान यांच्या कोंढव्यातील घरावर कारवाई करण्यात आली.

पीएफआयशी संबंधित गुन्ह्यांत एनआयए, जीएसटी, इडी आणि महाराष्ट्र एटीएस यांची संयुक्त कारवाई सुरू आहे. महाराष्ट्रातून आतापर्यंत पीएफआयच्या 20 जणांना अटक करण्यात आली आहे. तर, नवी मुंबईतील नेरूळच्या सेक्टर 23 मधील धारावे गावातही एनआयएनं धाड टाकली. एनआयएच्या टीमनं मुस्लिम संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर रात्री 3 वाजता छापेमारी सुरू केली.

तर दुसरीकडे मालेगावात ईडी, एएनआयनं छापा टाकला असून पीएफआय संघटनेच्या एका सदस्याला पहाटे ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे. सैफुरहेमान असं ताब्यात घेण्यात आलेल्याचं नाव आहे. NIA आणि ईडीने आतापर्यंत शंभरहून अधिक जणांना अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रातल्या पुणे, मुंबईसह 20 ठिकाणी NIA, EDने छापे टाकले आहे.

तर दिल्ली, एमपी, तामिळनाडू, तेलंगणा, यूपी, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेशमध्ये ही छापेमारी सुरू आहे. PFIकडून अनेक संशयास्पद घटनांचा धोका असल्याचा अलर्ट आल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या वादग्रस्त संघटनेची तीन लाख फॅमिली अकाऊंट आहेत. या खात्यांमध्ये फॅमिली मेन्टेनन्सच्या नावाखाली कतार, कुवैत, बहरीन आणि सौदी अरेबियातून 500 कोटी रुपये आले आहेत, असा दावा एनआयएच्या सूत्रांनी केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.