उदयनराजे आज कोणती घोषणा करणार ?

0

सातारा : खासदार उदयनराजे आपल्या हटके शैलीमुळे नेहमीच चर्चेत असतात. कधी आपली कॉलर उडवल्यामुळे तर कधी पुष्पा चित्रपटातील डॉयलॉगमुळे त्यांची सर्वत्र चर्चा होते.

खासदार उदयनराजे भोसले यांचा वाढदिवस आहे. सातारकर नेहमीच राजेंचा वाढदिवस साजरा करण्यासाठी उत्सुक असतात. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी राजवाड्यावर दरवर्षी गर्दी असते.

दरम्यान आज ते एक मोठी घोषणा करणार आहेत. यासाठी त्यांनी जनतेस निमंत्रण दिले आहे. या संदर्भात उदयनराजे यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.

यानंतर राजकिय वर्तुळात खळबळ उडाली आहे. खासदार उदयनराजेंच्या वतीनं एक निवेदन जारी करण्यात आलं आहे या निवेदनात ते म्हणतात की, या 24 तारखेला एक मोठा घोषणा करायचं मनात आहे.

राजकीय आरोप-प्रत्यारोपाच्या या वातावरणात पहिल्याच वाक्याने ज्या ज्या शक्यता तुमच्या डोक्यात आल्या असतील त्यामधले काहीच नसणार आहे. उपक्रम अभिनव आहे तेव्हा हे आमंत्रण पण फार औपचारिक अशा धाटणीचे आहे.

आपण सारेच आपल्या भोवती सुरू असणाऱ्या घटना पाहत असतो. काही अयोग्य वाटल्या तर त्या कोणीतरी दुरुस्त करेल अशी इच्छा आपण व्यक्त असतो.

आम्ही मात्र एका सामाजिक प्रश्नावर गेली अनेक वर्षे प्रशासकीय बदलांसाठी अनेक प्रयत्न केले. पण ते पुरेसे नाहीत. गेल्या काही दिवसांच्या चिंतनातून आम्ही या प्रश्नाचे उत्तर म्हणून स्वत:च एक व्यवस्था उभी करण्याचं ठरविले आहे.

कोणता प्रश्न, काय व्यवस्था… अशा प्रश्नांच्या उत्तरांसाठी आम्ही आपणास सदर पत्राने आमंत्रण देत आहोत. कोणता प्रश्न काय व्यवस्था अशा प्रश्नांच्या उत्तरांसाठी आम्ही आपणांस सदर पत्राने आमंत्रण देत आहोत.

२४ फेब्रुवारी सायंकाळी सहा वाजता गांधी मैदान, राजधानी सातारा याठिकाणी आपण उपस्थित रहावे असे आमंत्रण देण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.