बनावट व्हिसा बनविणारी टोळी गजाआड

ब्रुनेई देशाचा बनावट शिक्का असणारे तब्बल 48व्हिसा जप्त

0

पिंपरी : ब्रुनेई देशात जाण्यासाठी बनावट व्हिसा बनवणारी टोळी हिंजवडी पोलिसांनी जेरबंद केली आहे. बनावट व्हिसा बनवणाऱ्यातिघांसह शिक्का बनवून देणाऱ्यास देखील पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीने तब्बल 125 लोकांकडून पासपोर्ट घेऊन त्यांनाव्हिसा बनवून देण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसे घेतले असल्याचे उघडकीस आले आहे.

विजय प्रताप सिंग (44, रा. मामुर्डी, पुणे. मूळ रा. उत्तर प्रदेश), किसन देव पांडे (35, रा. मामुर्डी, पुणे. मूळ रा. उत्तर प्रदेश), हेमंतसीताराम पाटील (38, रा. किवळे, पुणे. मूळ रा. गवळे नगर, धुळे), किरण अर्जुन राउत (34, रा. शाहूनगर, चिंचवड) अशी अटककेलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलीस उपायुक्त बापू बांगर यांनी याबाबत माहिती दिली. आरोपी विजय, किसन आणि हेमंत हे पूर्वी इम्पोर्ट एक्स्पोर्टच्या व्यवसायातकाम करत होते. तिथे त्यांची एकमेकांशी ओळख झाली होती. हेमंत पाटील याने यापूर्वी नोकरीच्या आमिषाने लोकांना फसवण्याचागुन्हा केला आहे. त्यामुळे त्याने त्याच्या विजय आणि किसन या साथीदारांसोबत मिळून लोकांच्या फसवणुकीचा नवीन फंडा शोधूनकाढला.

भारतातून वेल्डर, वाहन चालक, प्लंबर असे काम करणारे कामगार एक ते दोन वर्षांसाठी विदेशात जातात. तिथे काम करून एकरकमीपैसे घेऊन भारतात येतात. त्यांना व्हिसा देण्यासाठी एजंट कंपनी सुरु करून त्याद्वारे लोकांकडून व्हिसा काढण्यासाठी पैसे घ्यायचे आणिपैसे घेऊन पळून जायचे. त्यानुसार मागील चार महिन्यांपासून आरोपींनी blue ocean marine company या नावाने कंपनी सुरुकेली.

व्हिसा काढून देण्यासाठी लोकांकडून खरे पासपोर्ट घेतले जात. विश्वास संपादन करण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठीनागरिकांना सांगितले जात. त्यानुसार नागरिकांकडून कागदपत्रे आल्यानंतर पासपोर्टवर ब्रुनेई देशाचा बनावट शिक्का मारून त्यांना खरेव्हिसा असल्याचे भासवून दिले जात.

ब्रुनेई देशात वेल्डर, वाहन चालक, प्लंबर या कामांसाठी कामगार पाहिजे असल्याचे सांगून नागरिकांना लुटण्याचा डाव आरोपींनीआखला होता. काहीजण ब्रुनेई देशात जाण्यासाठी व्हिसा घेऊन विमानतळावर गेले असता तिथे हे शिक्के बनावट असल्याचे निदर्शनासआले. त्यातील काही लोकांनी दिल्ली येथील ब्रुनेई देशाच्या दुतावासात जाऊन खातरजमा केली. त्यावेळी त्यांच्या पासपोर्टवर बनावटशिक्के मारले असल्याची खात्री झाली.

त्यानुसार मनीष स्वामी (32, रा. राजस्थान) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. हिंजवडी पोलिसांनी कस्तुरीचौकाजवळ असलेल्या आरोपींच्या कार्यालयात छापा मारूला असता तिथे तीन आरोपी मिळून आले. त्यांच्याकडून ब्रुनेई देशात वेल्डर, वाहन चालक, प्लंबर इत्यासाठी कामगार हवे असल्याच्या बनावट वर्क ऑर्डर, 67 पासपोर्ट, दोन लॅपटॉप, संगणक, सात मोबाईल फोन, बनावट शिक्के असा एकूण एक लाख 68 हजार 150 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. त्यातील 48 पासपोर्टवर Negara Brunei Darussalam या देशाचे व्हिसाचे खोटे शिक्के मारले आहेत.

पोलिसांनी आरोपींकडे चौकशी केली असता आरोपी हे सात दिवसात कार्यालय बंद करून पळून जाणार असल्याची माहिती समोरआली. वेळीच हिंजवडी पोलिसांनी कारवाई करत आरोपींना अटक केली. त्यामुळे हा प्रकार उघडकीस आला आहे.

या बसा शिक्के घेऊनच जा….

विजय, किसन आणि हेमंत या तिघांनी चिखली येथील युनिक प्रिंटर्स अॅंड झेरॉक्स या दुकानातून बनावट शिक्के तयार करून घेतले होते. पोलिसांनी दुकानदार किरण राउत याला देखील अटक केली. त्याने दुकानावरया बसा शिक्के घेऊनच जाअशा प्रकारची जाहिरातकेली होती. पैशांच्या लालसेपोटी किरण याने हे बनावट शिक्के तयार करून दिले असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.

मामुर्डी मधून 58 पासपोर्ट जप्त

आरोपी विजयप्रताप याने मामुर्डी येथील एका लॉंड्री चालवणाऱ्या व्यक्तीकडे महत्वाची कागदपत्रे म्हणून 58 पासपोर्ट ठेवण्यासाठी दिलेहोते. पोलिसांनी त्या लॉंड्री चालवणाऱ्या व्यक्तीकडे चौकशी करत तिथून 58 पासपोर्ट जप्त केले. या कारवाई मध्ये एकूण 125 पासपोर्ट जप्त करण्यात आले आहेत.

तपास पथकाला मिळणार बक्षीस

हिंजवडी तपास पथकाने हा गुन्हा उघडकीस आणल्या बद्दल पोलीस उपायुक्त बापू बांगर यांनी पथकाचे कौतुक केले. तसेच आगामीगुन्हे आढावा बैठकीत पोलीस आयुक्तांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार असल्याचे उपायुक्त बांगर यांनी सांगितले. या तपास पथकालायोग्य रिवार्ड देखील दिले जाणार आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त बापु बांगर, सहायक पोलीसआयुक्त डॉ. विशाल हिरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे प्रमुख सहायक पोलीसनिरीक्षक राम गोमारे, पोलीस अंमलदार बंडू मारणे, बाळकृष्ण शिंदे, नरेश बलसाने, बापुसाहेब धुमाळ, योगेश शिंदे, कैलास केंगले, कुणाल शिंदे, विक्रम कुदळ, मंगेश सराटे, अरूण नरळे, रितेश कोळी, श्रीकांत चव्हाण, चंद्रकांत गडदे, कारभारी पालवे, दत्ता शिंदे, अमरराणे, ओमप्रकाश कांबळे, सागर पंडीत यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.