मोठी कारवाई; दरोडा विरोधी पथकाने केले पिस्तूल खरेदी विक्रीचे रॅकेट उध्वस्त

सात पिस्तुल, पाच जिवंत काडतुसे जप्त; वेपन डीलर देखील पोलिसांच्या जाळ्यात

0

पिंपरी : पिंपरीचिंचवड गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहेवेपन डीलरसह चौघांना अटक करतत्यांच्याकडून सात पिस्तूल आणि पाच काडतुसे अशा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहेशस्त्रांची शहरात चालणारी बेकायदेशीरखरेदी विक्री यानिमित्ताने मोडून निघाली आहे.

अर्जुन भाऊराव सूर्यवंशी (20, राआळंदी), तुषार नथुराम बच्चे (31, राशिवाजीवाडीमोशी), कमल रामदास राठोड (26, रानाणेकरवाडीताखेड), अंकित भस्के अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

सहायक पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपनर यांनी दिलेल्या माहितीनुसारदरोडा विरोधी पथकातील पोलीस शिपाई गणेश सावंतसुमित देवकर आणि विनोद वीर यांना मरकळ गाव येथे एक गुन्हेगार पिस्तूल घेऊन येणार असल्याची माहिती मिळालीत्यानुसारपोलिसांनी अर्जुन सूर्यवंशी याला सापळा लावून ताब्यात घेत त्याच्याकडून दोन पिस्तुलांनी दोन काडतुसे जप्त केलीसूर्यवंशी याच्याविरोधात आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

त्याच्याकडे केलेल्या तपासात त्याने वेपन डीलर अंकित भस्के याच्याकडून हे पिस्तूल विकत आणले असल्याचे सांगितलेसूर्यवंशी यानेभस्के याच्याकडून आणखी दोन पिस्तूल आणि काडतूस विकत घेऊन ते सराईत गुन्हेगार तुषार बच्चे याच्याकडे ठेवण्यास दिल्याचेहीत्याने तपासात सांगितलेपोलिसांनी मोशी येथून बच्चे याला ताब्यात घेत त्याच्याकडून दोन पिस्तूल आणि एक काडतूस जप्त केले.

दरम्यानवेपन डीलर असलेला अंकित भस्के याला अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर पोलिसांनी पिस्तूल बाळगल्या प्रकरणी अटक केलीहोतीतो न्यायालयीन कोठडीत असताना पिंपरीचिंचवड पोलिसांनी त्याला कारागृहातून ताब्यात घेतलेत्याच्याकडून आणखी दोनपिस्तूल आणि एक काडतूस पोलिसांनी जप्त केले.

अंकित याने आणखी एक पिस्तूल नाणेकरवाडी येथील कमल राठोड याला विकले होतेपोलिसांनी कमल राठोड याला अटक कृंतयांच्याकडून एक पिस्तूल आणि एक काडतूस जप्त केलेया कारवाईमध्ये दरोडा विरोधी पथकाने सात पिस्तूल आणि पाच काडतुसेजप्त केली आहेत.

आरोपी अंकित भस्के हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत्याच्यावर पिंपरीचिंचवड आणि अहमदनगर येथे शरीराविरुद्धचे गुन्हेअग्निशस्त्र बाळगणेतस्करी करणे असे गुन्हे दाखल आहेतअर्जुन सूर्यवंशी याच्या विरोधात खुनाचा प्रयत्नमारामारीचे गुन्हे दाखलआहेततुषार बच्चे याच्या विरोधात देखील जमाव जमवून दहशत निर्माण करणेअग्निशस्त्र बाळगणे असे गुन्हे दाखल आहेतदरोडाविरोधी पथकाने चालू वर्षात पाच कारवायांमध्ये 13 पिस्तूल आणि 13 काडतुसे जप्त केली आहेत.

ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबेअपर पोलीस आयुक्त वसंत परदेशीपोलीस उपायुक्त (गुन्हेसंदीप डोईफोडेपोलीसउपायुक्त शिवाजी पवारसहायक आयुक्त बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंतउपनिरीक्षक भरत गोसावीपोलीस अंमलदार गणेश सावंतसुमित देवकरविनोद वीरसागर शेडगेराहुल खारगेप्रवीण कांबळेप्रवीण मानेआशिष बनकरगणेश हिंगेचिंतामण सुपेऔदुंबर रोंगेउमेश पुलगमनागेश माळीप्रमोद उलगे यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.