शिवराज्यभिषेक सोहळा : रायगडावर लाखो मावळे दाखल

0

रायगड : किल्ले रायगडावर आज तारखेनुसार 350 वा शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी रायगडावरअडीच लाख शिवभक्त जमले आहेत. छत्रपती संभाजीराजे पूर्णवेळ उपस्थित राहणार आहेत. ढोल ताशांच्या गजरात शिवरायांच्याजयघोषाने संपूर्ण किल्ले रायगड दुमदुमून निघाला आहे. जय भवानी जय शिवराय, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा जयघोषांनीशिवभक्तांमध्ये उत्साह संचारलेला आहे. सुमारे अडीच लाख शिवभक्त रायगडावर आल्याने सर्वांनी शिस्तबद्धपणे शिवरायांचे दर्शनघ्यावे, असे आवाहन आयोजन समितीकडून करण्यात आलेले आहे.

कोल्हापूरच्या नवीन राजवाड्यात पहिल्यांदाच शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होत आहे. या ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजनकरण्यात आलेले आहे.

पुण्यातील ऐतिहासीक लाल महालात छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक करण्यात आला. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरदपवार यांची उपस्थिती होती.

दुर्गराज रायगडावर सध्या जवळपास अडीच लाख लोक उपस्थित असून गडाच्या खाली जवळपास 50 -75 हजार लोक आलेले आहेत. इतके लोक गडावर सामावणे शक्य नसल्याने कृपया गडाखाली असलेल्या लोकांनी गड चढण्याची घाई करू नये. जिल्हा पोलीसप्रशासन सोबत बैठक झालेली आहे. सध्या गडावर असलेले लोक9-10 च्या दरम्यान गड उतरतील, तेव्हा शिस्तबद्ध रीतीने खालीअसलेल्या लोकांना वरती सोडले जाईल. सर्व शिवभक्तांना महाराजांना अभिवादन करता येईल, तोपर्यंत मी गडउतार होणार नाही, याचीशाश्वती मी देतो, असे आश्वासन छत्रपती संभाजी महाराज यांनी दिले.

शिवाजी महाराज यांच्या कर्तृत्वाला मानवंदना म्हणून राज्य सरकार मंगळवारी विशेष टपाल तिकिटाचे अनावरण राज्यपालांच्या हस्तेकरणार आहे. राजभवनात सायंकाळी हा कार्यक्रम होईल.

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा मंगळवारी रायगडावर मोठ्या थाटात साजरा होत आहे. यासाठी हजारो शिवभक्तसोमवारीच गडावर दाखल झाले आहेत. मावळ्यांच्या वेशभूषेतील तरुणांनी विविध चित्तथरारक प्रात्यक्षिके दाखवून उपस्थितांची मनेजिंकली. शाहिरांनी पोवाडेही सादर केले.

आज तारखेनुसार छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्यभिषेक सोहळा साजरा होत आहे. 6 जून 1674 रोजी म्हणजेच ज्येष्ठ शुद्धत्रयोदशी या दिवशी विधीपूर्वक राज्याभिषेक होऊन शिवराय छत्रपती झाले. किल्ले रायगडावर भूतो भविष्यति असा झालेलाशिवराज्याभिषेक सोहळापार पडला. ही इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिलेली घटना होती. आज 6 जून रोजी तारखेनुसार 350 वाशिवराज्यभिषेक सोहळा साजरा केला जात आहे. यंदा 2 जून रोजी तिथीनुसार आणि 6 जून रोजी तारखेनुसार शिवराज्याभिषेकाला349 वर्षे पूर्ण होऊन 350 वं वर्ष सुरु होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.