22 राज्यांमधील 235 जिल्ह्यांना पुराचा फटका

0

नवी दिल्ली : देशभरातील 22 राज्यांमधील 235 जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे. या पावसाळ्यात 19 जुलैपर्यंत अतिवृष्टीमुळे 747 जणांचा मृत्यू झाला आहे. 10 हजार घरे उद्ध्वस्त झाली आहेत.

पुरामुळे 2.50 लाख हेक्टर पीक नष्ट झाले आहे. त्याचबरोबर मृत जनावरांची संख्या 21 हजारांच्या पुढे गेली आहे.

महाराष्ट्रातील रायगड येथे भूस्खलनामुळे 48 घरे ढिगाऱ्याखाली गाडले गेले. यामध्ये 16 जणांचा मृत्यू झाला. रायगडमध्ये 6 पैकी 3 नद्या धोक्याच्या चिन्हावरून वाहत आहेत.

यामध्ये अंबा, सावित्री आणि पाताळगंगा यांचा समावेश आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, कुंडलिका, गढ़ी आणि उल्हास नद्यांच्या पाण्याची पातळी धोक्याच्या चिन्हाजवळ पोहोचली आहे.

महाराष्ट्रात पूरसदृश परिस्थिती असताना एनडीआरएफच्या १२ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. दुसरीकडे, गुजरातमधील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर 6 जिल्ह्यांमध्ये NDRF तैनात करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.