बंगळुरू मध्ये आज विरोधकांची दुसरी मिटिंग

0

बेंगलोर : 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभूत करण्यासाठी विरोधी पक्षांची आज बंगळुरू येथे दुसरी बैठक होणार आहे. त्यात 26 पक्ष सहभागी होण्याची शक्यता आहे.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी 8 नव्या पक्षांना निमंत्रण दिले आहे. ही बैठक आधी शिमला येथे होणार होती, मात्र गेल्या काही दिवसांपासून हिमाचलमध्ये मुसळधार पावसामुळे स्थळ बदलण्यात आले.

सोनिया गांधी पहिल्यांदाच विरोधी पक्षांच्या एकजुटीच्या बैठकीला उपस्थित राहू शकतात. बैठकीपूर्वी त्या सोमवारी विरोधी पक्षांच्या नेत्यांसाठी डिनरचे आयोजन करू शकतात.

गुडघ्याच्या दुखापतीमुळे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या डिनरला उपस्थित राहू शकणार नाहीत. त्याचवेळी शरद पवार डिनरला उपस्थित राहणार नसल्याची चर्चा आहे.

24 दिवसांपूर्वी 23 जून रोजी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पाटणा येथे पहिली बैठक बोलावली होती, ज्यामध्ये 17 राजकीय पक्ष सहभागी झाले होते. या वेळी विरोधी गट आणखी मजबूत करण्यासाठी आणखी 8 पक्षांना निमंत्रित करण्यात आले आहे.

दुसरीकडे, एनडीएने 18 जुलैला बैठक बोलावली आहे. यामध्ये सरकारसोबत 30 पक्ष दिसणार असल्याचे बोलले जात आहे. यासाठी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी एनडीएच्या मित्रपक्षांना निमंत्रण पत्रे पाठवण्यास सुरुवात केली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.