चांद्रयान 3 : आज दुपारी 2 वाजून 35 मिनिटाने झेपवणार

0

नवी दिल्ली : सतीश धवन स्पेस सेंटरच्या लाँचिंग पॅडहून चांद्रयान-३ रवाना करण्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. २६ तासांच्या उलटगणतीला गुरुवारी दुपारी १.०५ वाजता सुरुवात झाली. लाँच व्हेइकल मार्क-३ एम-४ रॉकेटमध्ये इंधन भरण्यात आले आहे. या रॉकेटच्या सर्वात वरच्या भागात चांद्रयान-३ स्वार आहे. शुक्रवारी दुपारी २.३५ वाजता ते आपल्या सफरीवर निघून जाईल. ते चंद्रावर २३ किंवा २४ ऑगस्टला पोहोचू शकते.

आतापर्यंत कोणत्याही देशाला चंद्राच्या दक्षिणेकडील ध्रुवावर लँडिंग करता आलेली नाही. भारत यशस्वी झाल्यास ही कामगिरी करणारा तो पहिलाच देश ठरेल. इस्रोचे चेअरमन एस. सोमनाथ म्हणाले, चंद्रावरून पृथ्वीच्या लाइफ सिग्नेचरला पकडणे महत्त्वाचे असेल. यातून परग्रहावरील जीवनाची शक्यता तपासण्यासाठी मदत होऊ शकेल. चांद्र मोहिमेच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष सोमनाथ यांच्यासह संशोधकांच्या दलाने तिरुपतीमध्ये भगवान वेंकटेश्वराचे पूजन केले. चांद्रयानचे मॉडेलही अर्पण केले.

तिसऱ्या प्रोपल्शन मॉड्यूल हे लँडरला चंद्राच्या नजीकच्या कक्षेत पोहोचवल्यानंतर पृष्ठभागावर उतरवण्यासाठी सोडते व त्याच्या संपर्कात राहते. हे त्याचे काम आहे. शिवाय ते कमांड सेंटरला सिग्नल पाठवते. त्यासाठी चांद्रयान-२ चे ऑर्बिटरही उपलब्ध असेल. प्रोपल्शन मॉड्यूलमध्ये शेप उपकरणाद्वारे चंद्रावरून पृथ्वीवरील जीवनाच्या लक्षणांचा वेध घेतला जाईल.

 

Leave A Reply

Your email address will not be published.