हडपसरमधील 25 वर्षीय ‘मॉडेल’वर लैंगिक अत्याचार

मेसर्स बॉलिवूड फिल्म इक्विपमेंटच्या ‘राजेश माल्या’सह तिघांवर बलात्काराचा गुन्हा

0

पुणे : पुण्याच्या हडपसरमधील 25 वर्षीय ‘मॉडेल’ तरुणीसोबत वेळोवेळी शारिरीक संबंध ठेवून एकांतातील फोटो व्हायरल करण्याची तसेच ब्ल्यु फिल्म बनविण्याची व बदनामी करण्याची धमकी देऊन 10 लाख रुपयांची खंडणी मागण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी वारजे पोलिसांनी बॉलिवूडमधील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मेसर्स बॉलिवूड फिल्म इक्विपमेंटचा राजेश माल्या आणि अभिजित गणपत साठे (३४, रा. वारजे) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्यासह एका महिलेवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी हडपसर  येथील एका 25 वर्षाच्या तरुणीने वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार जुलै 2017 पासून 21 जुलै 2021 दरम्यान घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चित्रपटात काम करण्यासाठी फिर्यादी आणि अभिजित साठे यांची ओळख होती.
साठे याने फिर्यादीसोबत वेळोवेळी जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले. त्यांच्या दोघांच्या एकांतातील फोटो व्हायरल करण्याची व ब्ल्यु फिल्म बनविण्याची धमकी दिली.

साठे याने फिर्यादीबरोबर शरीर संबंध ठेवले व इतरांनी संगनमत करुन फिर्यादीस चित्रपटात काम देतो, फोटो शुट कंपनी काढु इत्यादी भुलथापा देऊन फिर्यादीकडून 6 लाख 41 हजार रुपये घेऊन पैशांचा अपहार केला.

फिर्यादीचे फोटो  व्हायरल करुन बदनामी करण्याची धमकी देऊन आणखी 10 लाख रुपयांची खंडणी मागितली.
त्यात एका वकिलांनी तडजोड करण्यासाठी जबरदस्तीने ब्लॅकमेल करुन नोटरी केली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी राजेश माल्ल्या याच्यासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. ही चित्रपटांना कॅमेरा आणि लाईटिंगचे साहित्य भाड्याने पुरविणारी सर्वात मोठी कंपनी आहे. पोलीस उपनिरीक्षक कथले अधिक तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.