‘गुलाब’ चक्रीवादळामुळे राज्यात पावसाची शक्यता

0

मुंबई : बंगालच्या उपसागरात घोंघावणाऱ्या तिव्र कमी दाबाच्या क्षेत्राचे शनिवारी संध्याकाळी चक्रिवादळात रुपांतर झाले. उत्तर आंध्र प्रदेश व दक्षिण ओदिशा किनार पट्टीला चक्रिवादळाचा नारंगी इशारा देण्यात आला आहे. या चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर देखील परिणाम होणार असून अनेक भागात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

‘गुलाब’ चक्रीवादळ सध्या गोपालपूर पासून 370 किमी पूर्व-दक्षिण/पूर्व, तर कलिंगपट्नम पासून 440 किंज पूर्वला आहे.हे चक्रिवादळ आज (ता.26) संध्याकाळी उत्तर आंध्र प्रदेश व दक्षिण ओरीसा किनारपट्टीला कलिंगपट्नम व गोपालपूरल मध्ये धडकण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. ‘गुलाब’ चक्रीवादळामुळे तयार होणाऱ्या वातावरणाचा परिणाम महाराष्ट्रात होणार असून हवामान विभागाने राज्यासाठी पण पुढच्या 3,4 दिवसासाठी काही ठिकाणी मुसळधार पावसाचे इशारे दिले आहेत.खास करून कोकण,मध्य महाराष्ट्र,मराठवाडा आणि विदर्भात पाऊस पाडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पुढील तीन दिवस पावसाचा जोर राहणार आहे. कोकण,मध्य महाराष्ट्र,मराठवाडा व विदर्भात 26 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर पर्यंत बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याचा अंदाज वर्तवण्यात आली आहे. तर कोकणातील उत्तर किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पाकिस्तान कडून नामकरणपश्चिम बंगाल च्या उपसागरात जे चक्रीवादळ निर्माण झाले आहे त्याचे ‘गुलाब’ असे नामकरण करण्यात आले आहे. हे नामकरण पाकिस्तान ने केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.