फडणवीस-अजित दादा दोघे मिळून शिंदेचा कार्यक्रम करणार : राऊत

0

मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोघे मिळून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा करेक्ट कार्यक्रम करतील, असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. फडणवीस आणि अजित पवार यांची यांची मैत्री अंडर करंट आहे. ते दोघे मिळून शिंदे यांचा करेक्ट कार्यक्रम करतील हे मी आधीपासून सांगत आलो आहे. हे सर्व काही स्क्रिप्ट प्रमाणे चालू आहे आणि सर्व काही स्क्रिप्ट प्रमाणेच होईल, हे सगळे ठरलेले आहे, असे देखील ते म्हणाले.

खासदार संजय राऊत यांनी मणिपूरधील घटनेवरून थेट केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. खासदार राऊत म्हणाले की, संपूर्ण देश आणि विश्वासमोर ‘मणिपूर फाईल्स’ ओपन झाल्या आहेत. लोकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. ही केवळ एक घटना समोर आली आहे. परंतु तिथे अशा कित्येक घटना घडल्या असल्याचा आरोपही त्यांनी केला.

 

Leave A Reply

Your email address will not be published.