एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यास वरिष्ठ नेते तयार नव्हते : देवेंद्र फडणवीस

0

मुंबई : एका चॅनलवर सुरू असलेल्या ‘खुपते तिथे गुप्ते’ कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काही गौफ्यस्फोट केले आहेत. यात विशेष करून एकनाथ शिदेंना मुख्यमंत्री करण्याचा प्रस्तावाला दिल्लीतील भाजपचे नेतृत्व मान्य नव्हते. परंतू मी त्यांना विनंती केली. त्यानंतर बराच काळ उलटल्यानंतर त्याला मंजुरी दिली. त्याग आणि समर्पण भावनेने मी वरिष्ठांचा निर्णय मान्य करून मी उपमुख्यमंत्री झालो. पण त्यानंतर राज्यात चांगले सरकार स्थापन झाले.

नुकत्याच झालेल्या या कार्यक्रमात एपिसोड देवेंद्र फडणवीसांनी आज त्यांच्या ट्विटद्वारे शेअर केले. त्यात त्यांनी एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्री बनण्याचा प्रवास कसा झाला याविषयी भाष्य केले आहे.

एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केल्यानंतर देवेंद्र फडणवीसांना बॅकफूटवर आणले गेले अशी चर्चा रंगली होती. तेव्हा खुद्द देवेंद्र फडणवीसांना देखील धक्का बसला होता. परंतू, शिंदेंना मुख्यमंत्री केले म्हणून त्यांना धक्का बसला नव्हता तर त्यांना प्रदेशाध्यक्ष करायचे सोडून उपमुख्यमंत्री केले. कारण, उद्या लोक काय म्हणतील हा प्रश्न माझ्यासमोर होता. पण यामागील गेम प्लॅन वेगळाच होता. असेही त्यांनी सांगितले.

एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनविण्याचा प्रस्ताव कोणी दिला? यावर फडणवीस यांनी मी आणि एकनाथ शिंदे भेटलो तेव्हा हे सरकार आपल्या विचारांना पटणारे नाही, असे एकमत झाले. मी ठरविले होते की मी मुख्यमंत्री होणार नाही.

सरकार बदलण्यावर चर्चा झाली, हिंदू आणि हिंदुत्वाचा दम घुटत होता. तेव्हा मी एकनाथ शिंदे एवढे मोठे पाऊल उचलतायत तर त्यांनीच मुख्यमंत्री व्हायला हवे असे मत मांडले. दिल्लीत गेलो, वरिष्ठांना हे सांगितले. त्यांना समजावण्यात खूप वेळ गेला. माझ्या पक्षाने लगेचच माझा प्रस्ताव स्वीकारला नाही, त्याला बराच वेळ द्यावा लागला, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

एकनाथ शिंदे एवढे मोठे पाऊल उचलणार आहेत, त्यांनाच नेता बनवावे यावर पक्षाचे नेते सहमत होते, परंतू ते लोकांमध्ये विश्वास निर्माण करू शकतील का? या सवालावर सारे अडले होते. परंतू, काही दिवसांनी दिल्लीतील नेत्यांनी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्यावर होकार दिला, असे फडणवीस म्हणाले.

मला प्रदेशाध्यक्ष व्हायचे होते. तशी वरिष्ठांशी बोलणीही झाली होती. मी सरकारमध्ये राहणार नाही असे त्यांना सांगितले होते. प्रदेशाध्यक्ष बनून मी ती जबाबदारी पार पाडेन असे सांगितलेले. कठोर मेहनत घेऊन पुढील दोन वर्षांत पक्षाला एक नंबरला नेईन, सर्वकाही असे ठरले. पण ऐनवेळी मला उपमुख्यमंत्री करण्यात आले तेव्हा मला धक्का बसला असे फडणवीस म्हणाले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.