‘मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की’.. मिटकरींचे ट्विट

0

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील बंडानंतर वर्षभरानंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड घडवून आणले. सरकारमध्ये एन्ट्रीघेत उपमु्ख्यमंत्रीही बनले. आता तर त्यांच्या मुख्यमंत्री होण्याच्या चर्चाही सुरू झाल्या आहेत. ठाकरे गटाच खासदार संजय राऊतयांनीही अजित पवार लवकरच राज्याचे मुख्यमंत्री होतील असे म्हटले होते. आज अजित पवार यांचा वाढदिवस आहे.

कार्यकर्त्यांनीअजितदादांचे भावी मु्ख्यमंत्री म्हणून फलक लावले आहेत. त्यानंतर आता अजित पवार गटातील आमदार अमोल मिटकरी यांनीहीअसेच एक ट्विट केले आहे.

मिटकरी यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून एक व्हिडीओ ट्विट केला आहे. या व्हिडीओला त्यांनीमी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचामुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की…! लवकरच #अजितपर्वअसे कॅप्शन दिले आहे.

मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की……! लवकरच #अजितपर्व pic.twitter.com/12jZ8BMPRi

. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) July 21, 2023

अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड करत 2 जुलै रोजी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्याबरोबर शपथ घेतलेल्या आमदारांनाहीमंत्रीपदे मिळाली. मात्र, अजित पवार लवकरच राज्याचे मुख्यमंत्री होतील अशा चर्चा सातत्याने सुरू आहेत. सध्याची राजकीयपरिस्थिती पाहता त्यात तथ्य आहे की नाही हे आगामी काळात समजेलच. मात्र या चर्चांनी राज्याचे राजकारण एक वेगळ्याच वळणावरनेऊन ठेवले आहे.

विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान वर्षा बंगल्याच्या परिसरातही अजित पवार यांचे मुख्यमंत्री असा उल्लेख असलेलेबॅनर लागले आहेत. त्यामुळेही वेगळ्याच चर्चा सुरू झाल्या आहेत. यावर शिंदे गटातील नेत्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.