अजित पवार व आमदारांनी शरद पवार यांचा करेक्ट कार्यक्रम केला : मुख्यमंत्री शिंदे

0

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपसोबत जायचे ठरवले होते. मात्र, शरद पवारांनी ऐनवेळी पलटी मारली पण अजित पवार यांच्यासह आमदारांनी शरद पवार यांचा करेक्ट कार्यक्रम केला, असे विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

दरम्यान एकनाथ शिंदे पुढे बोलताना म्हणाले की, मला मुख्यमंत्रिपदाबाबत चिंता नाही, वरती बसलेले योग्य निर्णय घेतात. विरोधी पक्षाकडे काहीच काम नसल्याने ते अफवा पसरवतात. जे शरद पवार यांनी जे पूर्वी केले तेच आता झाले असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

एकनाथ शिंदे पुढे बोलताना म्हणाले की, राष्ट्रवादी फुटली, जे शरद पवारांनी पूर्वी केले तेच आता झाले. काम करणाऱ्या नेत्याला बाजूला केले तर असे अपघात होतात. 2017,2019 मध्ये स्वत: शरद पवारांनीच भाजपासोबत जाण्याचे ठरवले असे अजित पवारांनी सांगितले. शरद पवारांनी वारंवार अपमानित केले. यू-टर्न घेतला, मग नेते करणार काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.​​​​​​​ विरोधी पक्ष आम्हाला चांगले कसे बोलेल, ते छोट्या मनाचे आहेत. आमची विकासकामे पाहून ते घाबरलेत. जे प्रकल्प बंद पडावेत असे वाटत होते ते आम्ही करतोय. ​​​​​​​​​​​​​​

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांचे राज्याच्या विकासाला पाठबळ लाभत आहे विरोधकांच्या टीकेवर लक्ष देत नाही. महाराष्ट्रात आता ट्रीपल इंजिनचे सरकार आहे. त्यामुळे केंद्राकडून राज्याला मिळणारा निधीचा ओघ सुरु झाला आहे. प्रकल्पांमध्ये कुठल्याही प्रकारची कपात न करता, भरीव निधी मिळतो आहे. त्यामुळे आम्हाला शिवीगाळ केल्याशिवाय त्यांच्याकडे दुसरे काही नाही. जनतेला सगळे माहिती आहे. आम्ही कामावर लक्ष देतो.

Leave A Reply

Your email address will not be published.