“आज ‘चाणक्य’ लाडू खात असले तरी…”; दाक्षिणात्य अभिनेत्याची पोस्ट चांगलीच चर्चेत

0

मुंबई : स्वतःच्याच पक्षातील आमदारांनी दगा दिल्यानंतर अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्याने महाविकास आघाडी सरकार बुधवारी रात्री कोसळले. या घडामोडींनंतर भाजपच्या वतीने सरकार स्थापण्यासाठी आजच दावा केला जाणार आहे.

 

मात्र मुख्यमंत्र्यांच्या या राजीनाम्यावर राजकीय क्षेत्रामधून प्रतिक्रिया येत असतानाच मनोरंजन क्षेत्रातील एका नावाजलेल्या दाक्षिणात्य अभिनेत्याने उद्धव ठाकरेंचं कौतुक केलं असून भाजपाला लक्ष्य केल्याचं पहायला मिळत आहे.

भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधातील भूमिकांमुळे सोशल मीडियावर कायमच चर्चेत असणारे अभिनेते प्रकाश राज यांनी ट्विटरवरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं कौतुक केलं आहे. उद्धव ठाकरेंनी उत्तम काम केलं असं सांगतानाच प्रकाश राज यांनी ‘चाणक्य’ असं म्हणत भाजपाच्या नेत्यांना लक्ष्य केलंय. ट्विटरवरुन उद्धव ठाकरेंच्या कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलला टॅग करुन प्रकाश राज यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात “उद्धव ठाकरे सर, तुम्ही उत्तम काम केलं आहे.

 

ज्यापद्धतीने तुम्ही राज्यातील परिस्थिती हाताळली ती पाहता मला विश्वास आहे की महाराष्ट्रातील लोक तुमच्या पाठीशी उभे राहतील. आज चाणक्य लाडू खात असले तरी तुमचा प्रामाणिकपणा दिर्घकालीन आहे. तुम्हाला अधिक शक्ती मिळो,” असं प्रकाश राज यांनी ट्विटमध्ये म्हटलंय.

Leave A Reply

Your email address will not be published.