माझा लोकांवर विश्वास; घडलेल्या प्रकाराची अजिबात चिंता नाही : शरद पवार

0

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसवर सिंचन घोटाळ्याचे आरोप केले होते. त्यानंतर आता भाजपने अजित पवारांना सत्तेत घेऊन त्यांना या घोटाळ्यातून मुक्त केले, अशी उपरोधिक प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील राजकीय घटनाक्रमावर भाष्य करताना दिली आहे. अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी रविवारी दुपारी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली.

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षावर मोदींनी काही दिवसांपूर्वीच भ्रष्टाचाराचे आरोप केले. मग त्याच लोकांना पुन्हा राज्याच्या मंत्रिमंडळात त्यांनी स्थान दिले. याचा अर्थ त्यांनी केलेले आरोप वास्तव नव्हते. त्यामुळे मी पंतप्रधानांचा आभारी आहे. त्यांनी पक्षावरील आरोपाला मुक्त केले. आमच्या सहकाऱ्यांनी जी पक्षाची भूमिका आहे, त्यापेक्षा वेगळी भूमिका घेतली. उद्याच्या सहा तारखेला महाराष्ट्राच्या प्रमुख नेत्यांची बैठक होती. त्या बैठकीत प्रश्न उपस्थित केले होते. त्याला विरोध करून त्यांनी वेगळी भूमिका घेतली. आम्हीच पक्ष आहोत त्यांनी वेगळी भूमिका घेतली. विधीमंडळातील काही भूमिका घ्यायची त्याचे कारण म्हणजे त्यांची नावे ईडी घोटाळ्यात आली होती. त्यामुळे त्यांनी वेगळे होणे स्विकारले.

परंतू माझा महाराष्ट्र सर्वसामान्य जनतेवर व युवकांवर विश्वास आहे. त्यामुळे आम्ही एक आहोत, आमची साथ तुम्हाला आहे. असे मत लोकांकडून व्यक्त केले जात आहे. जो प्रकार घडला, मला चिंता नाही, असे मत शरद पवारांनी व्यक्त केले.

शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, आजचा दिवस संपला, उद्या सकाळी मी बाहेर पडून यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेत पुन्हा कामाला लागणार आहे. ही माझी भूमिका आहे. पक्षावर कोणीही दावा करावा. काही म्हणण नाही, माझा लोकांवर विश्वास आहे. मी लोकांमध्ये जाणार असे म्हणत त्यांनी अजित पवारांनी पक्षावर केलेल्या दाव्याच्या सूचकेतवर कलाटणी दिली.

संघर्षाची भूमिका घेतली, त्यांच्यात सहभागी झालो. तेव्हा कार्यकर्ते नाराज झाले. त्यामुळे पक्षसंघटना बांधणी करणे हे गरजेचे आहे. पक्षाचे प्रमुख नेते बसतील, या घटनेवर निर्णय घेतील. मी पक्षाचा अध्यक्ष आहे, काहींवर जबाबदारी टाकली आहे. जनरल सेक्रेटरी म्हणून सुनील तटकरे व प्रफुल पटेल यांची नेमणूक केली आहे. त्यांना मी स्पष्ट सांगतो की, त्यांनी स्वतःहून पक्षाच्या हिताच्या दृष्टीने त्यांनी पावले टाकावी. अन्यथा त्यांच्यावर कारवाई केली जाईल. तर त्यांनी लक्षात घेतले पाहिजे की, पक्ष नेतृत्वाचा त्यांच्यावर विश्वास राहिला नाही.

पक्षाच्या चौकटीच्या बाहेर ज्यांनी निर्णय घेतला त्यांच्यावर कारवाई केली जाणार नाही. माझे कोणाशीही बोललो नाही, विधानसभेत सदस्य त्यांच्यातील काही लोकांनी मला फोन केला. जाण्यापूर्वी भुजबळ मला भेटून गेले, तेव्हा त्यांनी शपथ घेतली हे कळाले. गुगली अजिबात नाही, दरोडा आहे, पार्टीच्या काही लोक भ्रष्ट्राचाराच्या आरोप केले त्यांच्यातील कार्यकर्त्यांना मुक्तता करण्याचे काम केले.

शरद पवार म्हणाले की, अजिबात नाही, पक्ष फुटला नाही, आणि घर फुटले असे मी कधीच म्हणणार नाही. हा विरोध फक्त विचाराचा आहे. त्यामुळे अजिबात मला चिंता नाही, त्यांच्या पुढच्या भवितव्यची चिंता आहे. त्यावर काळजी घेण्याची गरज आहे.

याचे सर्व श्रेय मी पंतप्रधानांना देणार आहे. खोक्यांचा वापर झाला असे तुम्हाला वाटते का, अजिबात नाही, कारण प्राईम-मिनिस्टर हे संविधानिक पद आहे. त्यामुळे मी असे शब्द मुळीच वापरणार नाही. पण येत्या काळात ज्यांच्यावर आरोप होते, त्यांना कशाप्रकारे हाताळले जाणार यावरून अगदी सिद्ध होईल, असे मला वाटते, अशी मत शरद पवारांनी व्यक्त केले.

अजित पवार, छगन भुजबळ यासह अनेक लोकांवर ईडीची नोटीस आहे. त्यामुळे हे सर्व लोक सत्तेत सहभागी झाले. मग यांना ईडी सरकार म्हणायचे का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता. यावर लोकांवर काही कारवाई झाली नाही तर त्यावर निर्णय घेतला जाईल. ज्यांना जायचे नाही ते थांबले नाही. आमच्या पक्षाची नवीन टीम तुम्हाला दिसेल. शपथविधीनंतर मला कोणाचाही फोन आला नाही. त्यामुळे त्याचा विचार करायचा नाही. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांनी यांना या पदावर राहण्याचा अधिकार नाही. उभी करू शकतो नवीन कतृत्वाची पिढी असे मत शरद पवारांनी व्यक्त केली.

16 आमदारांचा निर्णय घेण्यासाठी विधानसभा अध्यक्षांना याचा फायदा होईल. तर अजिबात त्याचा काही संबंध नाही. कारण तोपर्यंत विधानसभा, लोकसभा निवडणूका लागतील. असे मला वाटते, असे शरद पवार म्हणाले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.