एकनाथ खडसे यांच्या अडचणीत वाढ

0

जळगाव : एकनाथ खडसे यांनी भाजप सोडून ते जेव्हापासून राष्ट्रवादीत सामिल झाले आहेत, तेव्हापासून त्यांच्या अडचणींमध्ये वाढझाली आहे. कारण आता पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणात एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे या आरोपी आहेत. याविषयी मुंबई सत्र न्यायालयाने त्यांच्या विरुद्ध अटक वॉरंट काढलं आहे.

या प्रकरणी आज एकनाथ खडसे हे देखील न्यायालयात हजर राहू शकलेले नाहीत, एकनाथ खडसे यांच्यावर सध्या बॉम्बे हॉस्पिटलमध्येउपचार सुरु आहेत, खडसे हे आणखी काही दिवस रुग्णालयात राहणार आहेत, अशी माहिती त्यांच्या वकिलांनी दिली आहे

खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांनी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता, पण सत्र न्यायालयाने हा जामीन अर्ज फेटाळूनलावला आहे. यानंतर एकनाथ खडसे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे

Leave A Reply

Your email address will not be published.