टाटा पॉवर मध्ये मोठी नोकर भरती; इच्छुकांनी वाचा सविस्तर माहिती…

0

नवी दिल्ली : टाटा ग्रुपच्या टाटा पॉवर कंपनीमध्ये नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध असून, पदवीधर उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात, असे सांगितले जात आहे. देशातील ऊर्जा क्षेत्रातील प्रतिष्ठित कंपनी Tata Power या कंपनीत भरती प्रक्रिया राबवली जात आहे. तुम्ही अर्ज करण्यास इच्छुक असाल तर टाटा पॉवरच्या साइटवर अधिक माहिती मिळवता येऊ शकेल.

नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवाराकडे बीई, बीटेक किंवा डिप्लोमा पदवी असणे आवश्यक आहे. ग्रॅच्युएट इंजिनियर ट्रेनी आणि सुपरवायझर या पदासाठी अर्ज करता येऊ शकेल.
टाटा पॉवर कंपनीची सहाय्यक असलेल्या टाटा पॉवर सोलर सिस्टिम लिमिटेड या कंपनीतील पदांसाठी अर्ज करता येऊ शकणार आहे. बीई, बीटेक आणि डिप्लोमाच्या शेवटच्या वर्षाला असणारे विद्यार्थी, फ्रेशर्स यासाठी अर्ज करू शकतात.

या पदांसाठी भरती प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या उमेदवारांची देशातील कोणत्याही भागात नियुक्ती केली जाऊ शकते. या पदांवरील उमेदवाराला २.८ ते ३.२ लाख रुपयांपर्यंत वार्षिक पगार मिळू शकतो. अर्जाची शेवटची तारीख नमूद करण्यात आलेली नसल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, देशातील सर्वात मोठी, खाजगी क्षेत्रातील एकात्मिक कंपनी Tata Power कंपनीने देशभरात १ हजार पेक्षा जास्त इलेक्ट्रिक वाहनांसाठीचे (EV) चार्जिंग स्टेशन्सचे नेटवर्क उभारले आहे. पर्यावरणपूरक गतिशीलतेच्या दिशेने भारताच्या वाटचालीमध्ये हा एक महत्त्वाचा टप्पा टाटा पॉवरने पार केल्याचे सांगितले जात आहे.

देशभरात १००० सार्वजनिक EV चार्जिंग स्टेशन्सचे नेटवर्क ऑफिसेस, मॉल्स, हॉटेल्स, रिटेल आउटलेट्स आणि इतर सार्वजनिक ठिकाणी टाटा पॉवरच्या ग्राहकांना नाविन्यपूर्ण आणि अखंडित ईव्ही चार्जिंग सुविधा उपलब्ध केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.