दहशतवाद्यांचा घरात घुसून पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला, पती-पत्नीचा मृत्यू, मुलगी गंभीर

0

नवी दिल्ली : जम्मू कश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला असून यामध्ये एका पोलीस अधिकाऱ्याच्या घरात जाऊन त्यांना गोळ्या घातल्या आहेत. त्यात पोलीस अधिकारी आणि त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला आहे. तर त्यांची मुलगी गंभीर जखमी झाली आहे.

दक्षिण कश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात विशेष पोलीस अधिकारी फैय्याज अहमद यांच्या घरात घुसून काही दहशतवाद्यांनी गोळीबार केला. त्यात फैय्याज अहमद, त्यांची बायको आणि मुलगी   जबर जखमी झाली. तिघांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु वाटेतच फैय्याज अहमद आणि त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला. अहमद यांच्या मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी एका दहशतवाद्याला कंठस्नान घातले असू इतर दहशतवाद्यांचा शोध सुरु आहे.

Terrorists barged into the house of SPO Fayaz Ahmad of Hariparigam, Awantipora & fired indiscriminately. In this terror incident, he along with his wife & daughter received critical injuries. Ahmad succumbed to his injuries. Area cordoned off. Search going on: Kashmir Zone Police

— ANI (@ANI) June 27, 2021

जम्मू विमानतळावरील हवाई दलाच्या तळावर शनिवारी मध्यरात्री दहशतवादी हल्ला झाला. हल्लेखोरांनी ड्रोनच्या सहाय्याने पाच मिनिटांच्या अंतराने दोन स्फोट घडवले. हल्ल्यात हवाई दलाचे दोन जवान जखमी झाले. विमानतळावर उभी असलेली विमाने आणि हेलिकॉप्टर्स उडवून देण्याचा दहशतवाद्यांचा कट होता. यामागे पाकिस्तानचा हात असल्याचा दाट संशय आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) आणि हवाई दलाच्या उच्चस्तरीय पथकाने या हल्ल्याचा कसून तपास सुरू केला आहे.

Terrorists shot dead a former special police officer (SPO) of Jammu and Kashmir Police in his home at Hariparigam village in Pulwama district

— ANI (@ANI) June 27, 2021

Leave A Reply

Your email address will not be published.