अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम पाकिस्तानात

0

नवी दिल्ली : भारताचा मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम कुठे लपला आहे याची माहिती समोर आली आहे. दाऊदवर भारत सरकारपासून इंटरपोलनेही बक्षीस जाहीर केले आहे. असे असले तरी तो अजून पोलिसांच्या तावडीत सापडलेला नाही. परंतु तो पाकिस्तानमध्ये आहे अशी माहिती समोर येत आहे. दाऊदचा भाऊ इक्बाल इब्राहिम कासकरने ही माहिती दिली आहे.

भारतात अनेक दहशतवादी कारवाया करणार्‍या दाऊद कुठे लपला आहे याबद्दल त्याचा भाऊ इक्बाल कासकरने माहिती दिली आहे. एनसीबीने दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरला २०२१ ला अटक केली होती. तेव्हा एनसीबीच्या चौकशीदरम्यान इक्बालने सांगितले की छोटा शकील, अनीस इब्राहिम आणि दाऊद सध्या पाकिस्तानात राहत आहेत. १९९३ साली झालेल्या बॉम्बस्फोटाचा आरोपी जावेद चिकना हा सुद्धा पाकिस्तानमध्ये राहतो. पाकिस्तानमध्ये त्याने ड्र्ग्सचा व्यापार सुरू केला होता, या प्रकरणी तो सध्या तुरुंगात कैद आहे अशी इक्बाल कासकरने म्हटले आहे.

४ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय तपास यंत्रणेने दाऊद इब्राहिमचा जवळच्या सहकार्‍याला अटक केली होती. या आरोपीचे नाव मोहम्मद इक्बाल कुरेशी उर्फ सलीम फ्रूट आहे. सलीम फ्रूट हा मुंबई सेंट्रलच्या अरब लेन येथे एमटी अन्सारी मार्गावरील मीर अपार्टमेंटमध्ये राहयाचा. सलीम फ्रूट डी कंपनीसाठी काम करत होता.

राष्ट्रीय तपास यंत्रणेने दाऊद इब्राहिम, छोटा शकील आणि त्यांच्या साथीदारांविरोधात ३ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल केला होता. दाऊद इब्राहिम आणि त्याचे साथीदार ड्रग तस्करी, दहशतवाद, मनी लॉंड्रीग, दहशतवादासाठी पैसा पुरवणे, बेकायदेशीरणे जागा बळकावणे, लश्कर, जैश ए मोहम्मद आणि अल कायदा सारख्या दहशतवादी संघटनांना मदत करत होते. यापूर्वी पोलिसांनी १२ मे रोजी २ आरोपींना अटक केली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.