‘राष्ट्रवादी-काँग्रेसने शिवसेना हायजॅक केली’ : दीपक केसरकर

0

मुंबई : आम्ही आजही शिवसेनेत आहोत. आम्ही शिवसेनेतून बाहेर पडलो. असे भासवलं जात आहे. महाराष्ट्रात सध्याजे दाखवले जाते त्यापेक्षा परिस्थिती वेगळी आहे. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिकच असल्याची प्रतिक्रिया बंडखोर आमदार दिपक केसकर यांनी दिली आहे. शिवसेनेचे बंडखोर नेत्यांची आज बैठक झाली. या बैठकीनंतर दीपक केसरकर यांनी माध्यमांशी ऑनलाइन संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी आपण शिवसेनेला हायजॅक केलेलं नाही. तर राष्ट्रवादी-काँग्रेस पक्षाने शिवसेनेला हायजॅक केले असल्याची भूमिका मांडली.

आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न केला जातोय. आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा विचार पुढे घेऊन जात आहोत. आम्ही शिवसेनेचे सदस्य आहोत. आम्ही कुणाच्याही दबावाखाली बंड पुकारलेलं नाही. एकनाथ शिंदे हे आमच्या गटाचे नेते आहेत. आम्ही शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आलो आहोत. आमच्याकडे दोन तृतीयांश सदस्य आहेत, असेही दिपक केसरकर यांनी सांगितले.

आमच्या पक्षाचे नाव शिवसेनाच
एकनाथ शिंदे यांनी सत्तासंघर्षात एक पाऊल पुढं टाकलं आहे. आपल्या गटाचं नाव आता त्यांनी ठेवलं असून ‘शिवसेना-बाळासाहेब ठाकरे’ असं शिंदे गटाचं नाव ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. मात्र, आमच्या पक्षाचं नाव शिवसेनाच आहे. आम्ही शिवसैनिक म्हणून काम करणार आहे, असे म्हणत गटाचं नाव ठरल्याच्या चर्चांवर पडदा टकला.

आमदारांच्या मताप्रमाणे निर्णय होणे अपेक्षित

आम्ही सर्वजण शिवसेनेचे सदस्य आहोत. पक्षाच्या आमदारांच्या मताप्रमाणे निर्णय होणे अपेक्षित आसतं. त्यांचे काही अधिकार आणि निर्णय असतात. आपल्या राज्यामध्ये विविध कामे करावेत, अशी त्यांची अपेक्षा असते. तसेच सरकार चांगलं चालावं ही आपली जबाबदारी आहे म्हणून आम्ही आमच्या पक्षप्रमुखांना अनेकदा सूचवलं होतं. युतीमध्ये आपण लढलो, त्यांच्याबरोबर राहू या, असा निर्णय आमदारांनी घेतलेला होता, असं केसरकर यांनी सांगितलं.

आम्ही स्वत: निर्णय घेतला
कित्येक दिवस आम्ही सर्व उद्धव ठाकरे यांना सांगत होतो. ते पुढे सुद्धा आमचं ऐकतील, अशी आमची भावना आहे. एवढं सर्व सांगत आहेत तर त्याला काहीतरी कारण असेल. आम्हाला कुणीही सांगितले नाही. आम्ही स्वत:हून निर्णय घेतलेला आहे. एकनाथ शिंदे आम्हाला नेते म्हणून उद्धव ठाकरे यांनीच दिले आहेत. शिंदेंच्या संपर्कात सर्व आमदार होते. सर्वांनी मिळून ठरवले. जे तृतीयांश बहुमताचा विषय हा संविधानिक आहे, असेही केसरकर यांनी सांगितले.

आम्ही कोर्टात आव्हान देऊ
आमची संख्या 55 झाली आहे. 55 आमदारांचा नेता बदलायचा असेल तर तो 16 अंक एकत्र येऊन बदलवू शकत नाहीत. त्यामुळे जो काही निर्णय विधानसभेच्या उपाध्यक्षांनी दिलेला आहे त्या निर्णयाला आम्ही कोर्टात आव्हान देऊ. आमच्याकडे दोन तृतीयांश संख्या आहे. त्यामुळे कायद्यानुसार आम्हाला आमचा नेता निवडण्याचा अधिकार आहे, असं केसरकर यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.